गेल्या 8 महिन्यांत दोनदा झालाय मला जीवेमारण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर एलॉन मस्क यांचा खळबळजनक दावा
Donald Trump Attack: आतापर्यंत माझ्यावर आठवेळा जीवघेणा हल्ला झालाय, असा दावा टेस्लाचे एलॉन मस्क यांनी केला आहे.
Donald Trump Attack: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प जखमी झाले आहेत. पेनसिल्व्हेनिया येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. हल्ला इतरा भयंकर होता की, या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले आहेत. हल्ल्यात ट्रम्प यांच्या कानाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर फक्त अमेरिकाच नाहीतर संपूर्ण देश हादरला आहे. अशातच ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ट्विटरवर एका युजरनं टेस्ला सीईओ एलॉन मस्क यांच्यावरही हल्ला होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली आहे. त्यानंतर युजरला एलॉन मस्क (Elon Musk) यांनी दिलेल्या उत्तरानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यासोबतच एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी टेस्ला हेडक्वॉटर्सजवळ काही लोकांना बंदुकीसह अटक करण्यात आल्याचंही सांगितलं.
"एलॉन मस्क प्लीज तुमची सिक्युरिटी वाढवा, काळजी घ्या"
एका ट्विटर युजरनं म्हटलं आहे की, "प्लीज, प्लीज तुमच्या सुरक्षेत वाढ करा. जर ते ट्रम्प यांच्यावर हल्ला करू शकतात, तर ते तुमच्यावरही हल्ला करू शकतात." युजरनं काळजीपोटी केलेल्या मेसेजला मस्क यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, "येणारा काळ अत्यंत धोकादायक आहे. गेल्या 8 महिन्यांत दोन जणांनी (वेगवेगळ्या ठिकाणांवर) मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. टेक्सासमध्ये टेस्ला हेडक्वॉर्टरपासून जवळपास 20 मिनिटांच्या अंतरावर आरोपींना बंदुकींसह अटक करण्यात आली आहे."
दरम्यान, यापूर्वीही एलॉन मस्क (Elon Musk) यांनी त्यांच्यावर हल्ला करण्यात येत असल्याचा दावा केला होता. मला कधीही, कुठेही ठार केलं जाऊ शकतं, असं एलॉन मस्क म्हणाले होते. 200 मध्ये एलॉन मस्क यांनी टेक रिपोर्टर्सवर त्यांचं रियल टाईम लोकेशन शेअर करण्याचा आरोप लावला होता. तसेच, त्यांचे अकाउंट्सही बॅन केले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला
अमेरिकेचे माझी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यामध्ये सुदैवानं ट्रम्प यांना कोणतीही दुखापत झालेली नसून ते सुखरुप आहेत. ट्रंप पेंसिल्वेनियामध्ये एका रॅलीला संबोधित करत होते. तेवढ्यात अचनाक गोळीबार करण्यात आला. एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला लागून निघून गेली. ट्रम्प यांच्या कानातून रक्त वाहू लागलं. तेवढ्यात सिक्युरिटी गार्ड्सनी ट्रम्प यांना चारही बाजूंनी घेरलं आणि घटनास्थळावरुन सुरक्षित ठिकाणी नेलं. तसेच, सीक्रेट सर्व्हिसनं हल्लेखोराला जागीच ठार केलं.