एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गर्भवतीच्या डिलीव्हरीसाठी महिला डॉक्टरने स्वतःची प्रसुती थांबवली
डॉ. अमेंडा हेस 23 जुलै रोजी हॉस्पिटलमधील स्वतःच्या रुममध्ये होती. त्याचवेळी एका गर्भवतीच्या प्रसववेदना तिच्या कानावर आल्या. लिआ हॅलिडे- जॉनसन ही गर्भवती विव्हळत होती.
न्यूयॉर्क : डॉक्टरांना आपल्या समाजात देवाचं स्थान दिलं जातं. अमेरिकेतील एका महिला डॉक्टरने प्रसुतीवेदना सुरु असतानाही आपल्या सेवाव्रताचं स्मरण ठेवलं. रुग्णालयातील एका गर्भवतीच्या प्रसुतीसाठी तिने स्वतःची डिलीव्हरी रोखून धरली.
अमेरिकेतील केंटुकीमध्ये ही मन हेलावणारी घटना घडली आहे. डॉ. अमेंडा हेस 23 जुलै रोजी हॉस्पिटलमधील स्वतःच्या रुममध्ये होती. त्याचवेळी एका गर्भवतीच्या प्रसववेदना तिच्या कानावर आल्या. लिआ हॅलिडे- जॉनसन ही गर्भवती विव्हळत होती.
लिआच्या बाळाच्या मानेभोवती नाळ गुंडाळली गेली होती. लिआच्या डिलीव्हरीसाठी दुसऱ्या डॉक्टर येण्यास विलंब होत होता. त्यामुळे डॉ. अमेंडा यांनी निकड ओळखून स्वतःच ही केस हाती घेण्याचं ठरवलं. विशेष म्हणजे डॉ. अमेंडाने लिआचं बाळंतपण यशस्वीरित्या पार पडलं.
डॉ. अमेंडाच्या धैर्याचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे. अमेंडाच्या एलन जॉईस या दुसऱ्या अपत्याच्या डिलीव्हरीनंतर मायलेकाचा फोटो फेसबुकवर शेअर केला जात आहे. डॉ. अमेंडाने शब्दशः प्रसुतीच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपली ड्युटी बजावली.
पाहा फेसबुक पोस्ट :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सोलापूर
Advertisement