Diego Tortoise : 100 व्या वर्षी 800 मुलांचा 'बाप', 'हा' कासव आहे फार खास, वाचा याची कहाणी
Diego Tortoise : इक्वेडोरमध्ये राहणारे डिएगो कासव खूप प्रसिद्ध आहे. या कासवाचा उपयोग चेलोनोइडिस हडेन्सिस प्रजातीच्या कासवांना वाचवण्यासाठी करण्यात आला आहे.
Diego Tortoise : सध्या जगभरात चर्चा रंगली आहे एका कासवाची... इक्वेडोरमध्ये (Ecudor) राहणारे डिएगो कासव (Diego Tortoise) खूप प्रसिद्ध आहे. गलापागोस (Galapagos Tortoise) ही कासवांची प्रजाती वाचवण्यामध्ये या कासवाचं मोठं योगदान आहे. डिएगो कासव 100 व्या वर्षी 800 मुलांचा 'बाप' आहे. चेलोनोइडिस हडेन्सिसची ही कासवांची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर होती. यामुळे, कासवांची ही प्रजाती वाचवण्यासाठी एक विशेष मोहिम राबविण्यात आली. ज्यामध्ये गालापागोस बेटावरील चेलोनोइडिस हडेन्सिस कासवांची आवश्यकता होती.
महाकाय गॅलापागोस कासव डिएगो
डिएगो हा इक्वेडोरच्या गॅलापागोस बेटांवर आढळणारे एक महाकाय कासव आहे. हे बेट प्रशांत महासागरात आहे. चेलोनोइडिस हडेन्सिस प्रजातीच्या कासवांच्या प्रजननामध्ये डिएगोचा मोठा हात होता. डिएगो कासवाने एकट्याने 800 कासवांना जन्म दिला आहे.
डिएगो कासव 800 मुलांचा बाप
गलापागोस ही कासवांची प्रजाती वाचवण्याच्या मोहिमेत डिएगो कासवाचा मोठा वाटा आहे. या मोहिमेत डिएगो कासवाने या प्रजातीच्या 800 मुलांचा बाप बनला आहे. आता या कासवाचे वय 100 वर्षे आहे. 1960 मध्ये, संपूर्ण पृथ्वीवर चेलोनोइडिस हुडेन्सिस प्रजातीची केवळ 15 कासवं शिल्लक होती. यामुळे ही प्रजाती नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली.
डिएगो कासव निवृत्त
चेलोनोइडिस हडेन्सिस या कासवाच्या प्रजातीला वाचवण्याच्या मोहिमेत डिएगोचा समावेश करण्यात आला होता. या संपूर्ण मोहिमेअंतर्गत एकूण 2000 कासवं जन्माला घालण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. जन्मलेल्या एकूण कासवांच्या संख्येपैकी 40 टक्के कासवांना जन्म देण्यामध्ये डिएगो कासवाचा वाटा आहे. सुमारे 50 वर्षांपूर्वी या मोहिमेमध्ये डिएगो कासवासोबत आणखी 15 कासवांचा समावेश करण्यात आला होता. फॉस्टो लॅरेना सेंटरमध्ये गेल्या अनेक दशकांपासून चेलोनोइडिस ह्युडेन्सिसचे प्रजनन केंद्र चालवले सुरु होते. डिएगो कासवाला 2020 मध्ये निवृत्त करण्यात आले आहे.
डिएगो कासवाला निर्जन बेटावर सोडले
चेलोनोइडिस हडेन्सिस कासवाचे संभाव्य वय 200 वर्षांपर्यंत असते. त्यानुसार डिएगो कासवाचा समावेश सध्या तरुण कासवाच्या श्रेणीत करण्यात आला आहे. डिएगो कासवाचे वजन सुमारे 80 किलो आहे. त्याची लांबी 35 इंच आहे. सरळ, ताठ उभे केल्यावर या कासवाची उंची 5 फूट होते. डिएगो कासव 11 जानेवारी 2020 रोजी निवृत्त झाले. यानंतर डिएगोला एका निर्जन बेटावर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. इक्वेडोरच्या पर्यावरण मंत्र्यांनी याला एका युगाचा अंत म्हटले आहे.