एक्स्प्लोर
भाई एकदम फिट हैं : छोटा शकील
![भाई एकदम फिट हैं : छोटा शकील Dawood Ibrahim Not Down With Gangrene In Leg Says Aide Chhota Shakeel भाई एकदम फिट हैं : छोटा शकील](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2015/10/13224417/Dawood-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पाय कापावा लागणार असल्याचं वृत्त छोटा शकीलने फेटाळलं आहे. छोटा शकील हा दाऊद इब्राहिमचा राईट हॅण्ड म्हणून ओळखला जातो. एका इंग्लिश वृत्तपत्राशी बोलताना छोटा शकील म्हणाला की, 'भाई एकदम फिट हैं.'
ही निव्वळ अफवा
सोमवारी दिलेल्या माहितीनुसार दाऊद इब्राहिमला गँगरीन झाल्याची बात्तमी आली होती,त्याचा पायही कापण्याची शक्यता आहे असी माहिती मिळाली होती. "मात्र दाऊदच्या आजाराची निव्वळ अफवा आहे. तुमच्या एजन्सीकडे चुकीची माहिती आहे. ती केवळ अफवा आहे. भाई अगदी ठणठणीत आहेत," असं छोटा शकीलने सांगितलं.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा पाय कापावा लागणार : सूत्र
निवासस्थानी दाऊदवर उपचार दाऊदला गँगरीन झाला असून विष शरीरात पसरत आहे. त्यामुळे कराचीतील क्लिफ्टन या निवासस्थानी काही डॉक्टर दाऊदवर उपचार करत आहेत. दाऊदच्या उपचारासाठी लियाकत नॅशनल हॉस्पिटल आणि कंबाइड मिलिट्री हॉस्पिटलमधून डॉक्टरांचं पथक पाठवण्यात आल्याचं म्हटलं जात होतं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
पुणे
नाशिक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)