(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dawood Second Marriage: दाऊद कराचीतच, दुसरे लग्नही केले; हसीना पारकरच्या मुलाचा गौप्यस्फोट
Dawood Second Marriage: दाऊदची पहिली पत्नी महजबीन शेख व्हॉट्सअॅप कॉलच्या माध्यमातून परिवाराच्या संपर्कात आहे. हसीना पारकरच्या मुलाने एएनआयने तपासात दाऊदच्या सध्याच्या ठिकाणाविषयी देखील सांगितले.
Dawood Second Marriage: अंडरवर्ल्ड डॉन आणि ग्लोबल टेररिस्ट दाऊद इब्राहिमने (Dawood Ibrahim) पाकिस्तानात दुसरे लग्न केले आहे. त्याची दुसरी पत्नी पाकिस्तानातील पठाण कुटुंबातील आहे. दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरच्या मुलाने सप्टेंबर 2022 ला दिलेल्या जबाबामध्ये मोठा गौप्यस्फोट केला आहे.
NIA याआधी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दाऊद इब्राहिम एक विशेष टीम तयार करत आहे. ही टीम देशातील बड्या नेत्यांवर किंवा उद्योगपतींवर हल्ला करू शकते आणि मोठ्या शहरांमध्ये हिंसाचार पसरवण्याचा कट आहे. एनआयएने दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर (मृत) (Haseena Parkar) हिचा मुलगा अली शाहचा जबाब नोंदवला. या दरम्यान अली शाहने मोठा गौप्यस्फोट केला आहे.
अली शाहने आपल्या जबाबामध्ये म्हटले की, दाऊदने दुसरा विवाह केला आहे. दाऊद आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याचे सांगतो. मात्र अद्याप दाऊदने घटस्फोट दिलेला नाही. दाऊदची पहिली पत्नी महजबीन शेखवरून तपास यंत्रणाचे लक्ष हटवण्यासाठी ही दाऊदची चाल आहे. अली शाह दाऊदच्या पहिल्या पत्नीला जुलै 2022 मध्ये दुबईमध्ये भेटला होता. जेव्हा महजबीनने दाऊदने दुसरे लग्न केल्याची माहिती दिली आहे.
अली शाहचा दावा आहे की, दाऊदची पहिली पत्नी महजबीन शेख व्हॉट्सअॅप कॉलच्या माध्यमातून परिवाराच्या संपर्कात आहे. हसीना पारकरच्या मुलाने एएनआयने तपासात दाऊदच्या सध्याच्या ठिकाणाविषयी देखील सांगितले. अली शाह म्हणाला, सध्या दाऊद पाकिस्तानातील कराचीमध्ये आहे. कराचीमध्ये दाऊद इब्राहिम कासकर, हाजी अनीस उर्फ अनिस इब्राहिम शेख आणि मुमताज रहिम फाकी आपल्या परिवारासह अब्दुल्ला गाजी बाबा दर्गाच्या मागे डिफेन्स कॉलनी, कराची येथे राहतो.
भारतातील दहशतवादी कृत्यांसाठी डी कंपनीकडून रसद
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या भारतातील दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना हवालामार्फत 'मोठी रक्कम' पाठवल्याचा आरोप राष्ट्रीय तपास संस्थेनं आपल्या आरोपपत्रातून केला आहे. इतकंच नव्हे तर काही बडे व्यावसायिक आणि राजकीय व्यक्तींना लक्ष्य करण्यासाठी डी कंपनीनं एक विशेष सेल स्थापन केल्याचा दावाही या आरोपपत्रातून केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Pakistan : पाकिस्तानच्या विमानतळावर अंडरवर्ल्डचा कब्जा, NIA च्या चौकशीत सलीम फ्रूटच्या पत्नीचा मोठा गौप्यस्फोट