Covid-19 | जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव! 55 लाख लोकांना संसर्ग, तर 22 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 लाखांवर पोहोचला असून 3 लाख 50 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 22 लाख 99 हजार 345 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
Coronavirus | जगभरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. जगभरातील 213 देशांमध्ये मागील 24 तासांमध्ये 96,505 नवे कोरोनाग्रस्त आढळून आसे आहेत. तसेच कोरोनासारख्या जीवघेण्या आजारांमुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत 2826 ने वाढ झाली आहे. तर याआधी एक दिवसाअगोदर 4183 रुग्णांचा मृत्यू झाला होता. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत जवळपास 55 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी 3 लाख 46 हजार 434 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 22 लाख 99 हजार 345 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरातील जवळपास 74 टक्के कोरोनाचे रुग्ण फक्त 12 देशांमध्ये आढळून आले आहेत. या देशांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 41 लाख आहे.
जगभरात कुठे किती रुग्ण?
जगभरात एकूण रुग्णांपैकी जवळपास एक तृतियांश रुग्ण अमेरिकेमध्ये आढळून आले आहेत. तर जवळपास एक तृतियांश रुग्णांचा मृत्यूही अमेरिकेत झाला आहे. अमेरिकेनंतर सर्वाधिक मृत्यू ब्रिटनमध्ये झाले आहेत. ब्रिटनमध्ये 36793 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आसून एकूण 259559 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ब्रिटनमधील रुग्णांची संख्या रूस, स्पेन आणि ब्राझीलपेक्षा कमी आहे. यानंतर इटली, फ्रान्स, जर्मनी, टर्की, इराण, भारत यांसारख्या देशांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.
अमेरिका : एकूण रुग्ण 1,686,436, मृत्यू 99,300 ब्राझील : एकूण रुग्ण 363,618, मृत्यू 22,716 रूस : एकूण रुग्ण 344,481, मृत्यू 3,541 स्पेन : एकूण रुग्ण 282,852, मृत्यू 28,752 यूके : एकूण रुग्ण 259,559, मृत्यू 36,793 इटली : एकूण रुग्ण 229,858, मृत्यू 32,785 फ्रान्स : एकूण रुग्ण 182,584, मृत्यू 28,367 जर्मनी : एकूण रुग्ण 180,328, मृत्यू 8,371 टर्की : एकूण रुग्ण 156,827, मृत्यू 4,340 इराण : एकूण रुग्ण 135,701, मृत्यू 7,417
पाहा व्हिडीओ : प्रवाशांची यादी द्या, उद्यापासून 125 ट्रेन द्यायला तयार,रेल्वेमंत्र्यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोमणा
12 देशांमध्ये एक लाखांहून अधिक रुग्ण
रुस, ब्राझील, स्पेन, यूके, इटलीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त सहा देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. अमेरिकेसह या 12 देशांमध्ये एकूण 41 लाख रुग्ण आहेत. अमेरिकेव्यतिरिक्त रुस आणि ब्राझीलमध्येही कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत आहे. पाच देश (अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, ब्रिटन) असे आहेत, जिथे 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. अमेरिकेमधील मृतांचा आकडा 99 हजार पार पोहोचला आहे. चीन टॉप-10 देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे. तर भारत टॉप-10 कोरोना बाधित देशांच्या यादीत सहभागी होण्याच्या उंबरठ्यावर आहे.
संबंधित बातम्या :
आजारी वडिलांना घेऊन 1200 किमी सायकल प्रवास, 15 वर्षीय ज्योतीचं इवांका ट्रम्पनंही केलं कौतुक
पाकिस्तानात कराची विमानतळाजवळ प्रवासी विमान कोसळून अपघात!
कोरोना लसची प्राथमिक मानवी चाचणी यशस्वी, अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीचा दावा