Couple Viral Video: प्रेमाच्या नात्याला निसर्गाचा कौल, बॉयफ्रेंडने प्रेयसीला प्रपोज केलं, अंगठी घालताना लालबुंद ज्वालामुखी आकाशात उसळला, VIDEO व्हायरल
Couple Viral Video: सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ अशाच अद्वितीय क्षणाचा साक्षीदार ठरला आहे. यात एक युवक आपल्या मैत्रिणीला डोंगरशिखरावर प्रपोज करतो आणि त्या नेमक्याच क्षणी दूरवरचा ज्वालामुखीचा उद्रेक होतो.

Couple Viral Video: प्रत्येक प्रपोजलची एक कहाणी असते, पण काही क्षण इतके नाट्यमय असतात की ते कायम लक्षात राहतात. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ अशाच अद्वितीय क्षणाचा साक्षीदार ठरला आहे. यात एक युवक आपल्या मैत्रिणीला डोंगरशिखरावर प्रपोज करतो आणि त्या नेमक्याच क्षणी दूरवरचा ज्वालामुखीचा उद्रेक होतो. व्हिडिओमध्ये दिसते की हे जोडपे फोटोजसाठी पोज देत असताना अचानक युवक एका गुडघ्यावर बसून प्रपोज करतो. आश्चर्यचकित झालेली मैत्रीण आनंदाने ‘हो’ म्हणते आणि त्या क्षणी दूरवरचा ज्वालामुखी धगधगत्या लाव्ह्यासह फुटतो. हे दृश्य इतकं अद्भुत ठरलं की तो क्षण पाहणाऱ्या प्रत्येकाला भारावून टाकतो. नेचरचा हा परफेक्ट टाइमिंग आणि रोमँटिक क्षण यामुळे व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर या क्षणाला पृथ्वीनेच मान्यता दिल्यासारखे असल्याचे म्हटले. यापूर्वीही निसर्गाच्या साक्षीने असे प्रपोजल झाले आहेत. यंदाच जुलै महिन्यात साऊथ डकोटामध्ये ब्राइस शेल्टन या युवकाने आपल्या प्रेयसी पेज बर्डोमसला एका प्रचंड टोर्नेडोच्या पार्श्वभूमीवर प्रपोज केले होते. या दोघांचा ‘स्टॉर्म चेसिंग’चा समान छंद असल्यामुळे तो क्षण त्यांच्या आयुष्यातील अनोखा आणि अविस्मरणीय ठरला.
व्हिडीओमध्ये काय दिसतंय?
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही महिन्यांपूर्वी एका कपलचा रोमँटिक क्षण व्हायरल झाला होता. हवाई बेटावरील किलाउए ज्वालामुखीच्या पार्श्वभूमीवर बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला प्रपोज केल्याचा तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता. आता असाच आणखी एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.ग्वाटेमालातील ‘व्होल्कॅन अकाटेनांगो’ पर्वतरांगांवर एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करतानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसते, कपल फोटोशूटमध्ये रमलेलं असतानाच तरुणाने अचानक खिशातून अंगठी काढली आणि गर्लफ्रेंडला आश्चर्यचकित केलं. तो गुडघ्यावर बसून लग्नाची मागणी घालताच, तिने आनंदाने होकार दिला.
View this post on Instagram
मात्र, याच क्षणी निसर्गाने जणू त्यांचं प्रेम मान्य केल्यासारखं घडलं, पाठीमागे ज्वालामुखीचा जोरदार उद्रेक झाला आणि लाव्हारस बाहेर पडू लागला. हा क्षण इतका अद्भुत होता की आसपासच्या लोकांच्या किंकाळ्या आणि आनंदाच्या आरोळ्या ऐकू येत होत्या. प्रेमी युगुलाच्या आयुष्यातला हा दिवस कायम लक्षात राहणार यात शंका नाही. कारण प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं की तिचा जोडीदार तिला खास, अविस्मरणीय आणि रोमँटिक पद्धतीने प्रपोज करावा. त्यासाठी मुलं वेगवेगळ्या हटके कल्पना राबवतात, पण या तरुणाने मात्र निसर्गाच्या साक्षीने इतिहास घडवला.























