एक्स्प्लोर
Advertisement
Corona World Update | जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 90 लाख पार, 4.69 लाख जणांचा मृत्यू
जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 90 लाखांच्या वर गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 48.33 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. कुठल्या देशात कोरोनाची काय स्थिती आहे? जाणून घ्या...
Coronavirus: : जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 90 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. मागील 54 तासात 3338 जणांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. तर एक लाख तीस हजारांहून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 90 लाख 45 हजार 457 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 4 लाख 69 हजारांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 48 लाख 33 हजार 574 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 62 टक्के कोरोनाबाधित हे केवळ 8 देशांमध्येच आहेत. एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोना संक्रमणाच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.
वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौथ्या स्थानावर आला आहे. भारतात कोविडचे 426,910 रुग्ण आहेत. तर 13,703 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 175,955 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 237,252 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या एक लाखावर
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 2,356,655 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 122,247 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ब्राझीलमध्ये 1,086,990 कोरोनाबाधित आहेत तर 50,659 लोकांचा मृत्यू झालाय. त्यानंतर यूकेत 42,632 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 304,331 इतकी आहे. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली चौथ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 34,634 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 238,499 हजार इतका आहे.
कोणत्या देशात किती कोरोनाबाधित
अमेरिका: कोरोनाबाधित - 2,356,655 मृत्यू- 122,247
ब्राझिल: कोरोनाबाधित - 1,086,990 मृत्यू- 50,659
रशिया: कोरोनाबाधित - 584,680 मृत्यू- 8,111
भारत: कोरोनाबाधित - 426,910 मृत्यू- 13,703
यूके: कोरोनाबाधित - 304,331 मृत्यू- 42,632
स्पेन: कोरोनाबाधित - 293,352 मृत्यू- 28,323
पेरू: कोरोनाबाधित - 254,936 मृत्यू- 8,045
चिली: कोरोनाबाधित - 242,355 मृत्यू- 4,479
इटली: कोरोनाबाधित - 238,499 मृत्यू- 34,634
इराण: कोरोनाबाधित - 204,952 मृत्यू- 9,623
दहा देशांमध्ये प्रत्येकी दोन लाखांहून अधिक कोरोनाबाधित
अमेरिका, स्पेन, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत, पेरु, इटली,इराण हे दहा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा दोन लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिकेत एक लाखाहून अधिक बळी गेले आहेत. यूके, ब्राझील या देशांमध्ये 40 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धाराशिव
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement