Covid-19 : चिंताजनक! जपानमध्ये कोरोनाची आठवी लाट, कोविड मृतांच्या संख्येत 16 पट वाढ
Japan Corona Update : जपानमध्ये 2021 वर्षी डिसेंबर महिन्याच्या एका आठवड्यात सुमारे 10 जणांचा मत्यू झाला होता. 2022 च्या डिसेंबर महिन्यात एका आठवड्यात 420 जणांचा मृत्यू झाला आहे.
Corona Death in Japan : चीननंतर (China) आता जपानमध्येही कोरोनाचा उद्रेक (Covid19 Surge) पाहायला मिळत आहे. जपानमध्ये (Japan) कोरोना (Corona) मृत्यांच्या संख्येत (Covid Patient Death) 16 पटीने वाढ झाल्याचे आढळून आले आहे. कोविड-19 ची आकडेवारी जमा करणाऱ्या वर्ल्डोमीटर वेबसाइटनुसार, रविवारी जपानमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले असून 326 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुसर्या एका रिपोर्टनुसार, जपानमध्ये कोरोनामुळे मृतांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
जपानमध्ये कोरोनाची आठवी लाट
जपानमध्ये गेल्या तीन महिन्यांत कोरोनामुळे मरण पावलेल्या लोकांची संख्या 2021 वर्षीच्या तुलनेत सुमारे 16 पट अधिक आहे. शनिवारी (31 डिसेंबर) जपानी प्रसारमाध्यमांना ही माहिती देण्यात आली. जपानचे राष्ट्रीय दैनिक वृत्तपत्र द मेनिचीच्या (The Mainichi) रिपोर्टनुसार, 2022 वर्षीची संख्या 2021 वर्षीच्या संख्येत खूप तफावत आहे. जपानमध्ये सध्या कोरोना महामारीच्या आठवी लाट असल्याचे बोलले जात आहे.
कोविड मृतांच्या संख्येत 16 पटीने वाढ
द मेनिचीच्या रिपोर्टनुसार, 2021 वर्षी 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत एका दिवसात सर्वाधिक 4 लोकांचा मृत्यू झाला होता, तर एका आठवड्यात एकूण 10 लोकांचा मृत्यू झाला होता. 2022 वर्षी डिसेंबरमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक 420 लोकांचा मृत्यू झाला. अहवालानुसार, गेल्या वर्षी 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत दररोज मृत्यूचे प्रमाण 3, 0, 1, 0, 0, 2 आणि 4 असे होते, तर आठवड्याभरातील कोरोनाबळींचा एकूण आकडा 10 होता.
2022 मध्ये तीन महिन्यांत 11,853 मृत्यू
जपानच्या आरोग्य, कामगार आणि कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2022 वर्षामध्ये शेवटच्या आठवड्यात दररोज अनुक्रमे 315, 339, 306, 217, 271, 415 आणि 420 मृत्यू झाले आहेत. यानुसार एका आठवड्यात एकूण 2,283 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अहवालानुसार, 1 ऑक्टोबर ते 29 डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत जपानमध्ये कोरोना महामारी शिगेला पोहोचली होती. 2021 वर्षामध्ये शेवटच्या तीन महिन्यांमध्ये 744 मृत्यू झाले होते, तर 2022 वर्षी ही संख्या 11,853 आहे.
वृद्धांना कोरोनाचा सर्वाधिक धोका
कोरोना संसर्गाचा सर्वात जास्त धोका वृद्धांना असल्याचे समोर आले आहे. अहवालानुसार, 90 आणि त्याहून अधिक वयोगटातील मृत्यू झालेल्यांची संख्या 34.7 टक्के, 80 ते 90 वयोगटातील मृतांची संख्या 40.8 टक्के, तर 70 ते 80 वयोगटातील मृतांची संख्या 17 टक्के असल्याचे सांगण्यात आले. एकूण, 92.4 टक्के मृत्यू हे 70 ते 90 वयोगटातील आहेत.