दिलासादायक! कोरोनावर 94.5 टक्के प्रभावी ठरतं वॅक्सिन; अमेरिकन कंपनी मॉर्डनाचा दावा
मॉर्डनाने दावा केला आहे की, त्यांनी तयार केलेलं कोरोना वॅक्सिन संसर्गापासून बचाव करण्यासाठी 94.5 टक्के प्रभावी असल्याचं निष्पन्न झालं आहे.
Corona Vaccine : रशियाची कोरोनावरील लस स्पुतनिक 5 नंतर आता अमेरिकेतील मॉर्डना इंक (Moderna Inc.) कंपनीनेही जीवघेण्या कोरोना व्हायरसवरील प्रभावी लस तयार केल्याचा दावा केला आहे. मॉर्डनाने दावा केला आहे की, त्यांनी तयार केलेलं कोरोना वॅक्सिन संसर्गापासून बचाव करण्यासाठी 94.5 टक्के प्रभावी असल्याचं निष्पन्न झालं आहे. अमेरिकेतील ही दुसरी कंपनी असून त्यांनी कोरोना वॅक्सिनच्या ट्रायल यशस्वी ठरल्याची घोषणा केली आहे. याआधी फायझरने घोषणा केली होती की, त्यांनी तयार केलेलं वॅक्सिन कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी 90 टक्के परिणामकारक आहे.
फायझरनंतर मॉर्डनाने घोषणा केल्यानंतर असं मानलं जात आहे की, अमेरिका डिसेंबरमध्ये या दोन्ही वॅक्सिनला मंजुरी देऊ शकते. असं सांगण्यात येत आहे की, मॉर्डनाने आपल्या वॅक्सिनचे 6 कोटी डोस तयार केले आहेत. दरम्यान, आता या दोन्ही कंपन्यांच्या वतीने करण्यात आलेल्या दाव्यांची तपासणी करण्यात येणार आहे. त्या तपासणीतून ठरवण्यात येईल की, वॅक्सिन कोरोनापासून बचाव करण्यासाठी कितपत फायदेशीर आहे आणि सुरक्षित आहे.
या दोन्ही वॅक्सिन नव्या टेक्नॉलॉजी प्रमाणे तयार केल्या गेल्या आहेत. ज्याला मेसेंजर आरएनए (mRNA) असं म्हटलं जातं. ही पद्धत कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी अत्यंत शक्तिशाली मानली जात आहे. पुढच्या वर्षीपर्यंत अमेरिकन सरकारला या दोन्ही वॅक्सिन निर्मात्या कंपन्यांकडून एक अरबहून अधिक डोस मिळू शकतात.
दरम्यान, चीनमधील वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या या जीवघेण्या व्हायरसने आतापर्यंत जगभारतील 5.4 कोटी लोकांना आपल्या विळख्यात अडकवलं आहे. यामध्ये 13 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना वॅक्सिनसंदर्भात हे वृत्त अत्यंत महत्त्वाचं ठरतं कारण, कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने युरोपियन देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्यासाठी भाग पाडलं आहे. तसेच अमेरिकेत आता रेकॉर्डब्रेक संख्येत नवे कोरोना रुग्ण समोर येत आहेत.
मॉर्डनाच्या प्रेसिडंट स्टीफन होज यांनी सांगितलं की, 'आपल्याला कोरोनावरील प्रभाव वॅक्सिन मिळणार आहे. हे कोरोनावर प्रभावी ठरतं. यामुळे आपण सर्वांना अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. प्रत्यक्षात वॅक्सिन कोरोना महामारी रोखण्यासाठी यशस्वी ठरणार आहे.'
नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ एलर्जी अँड इंफेक्शियस डिसीजचे निर्देशक अँथनी एस फौसी यांनी बोलताना सांगितलं की, 'ही दिलासादायक बातमी आहे. जर तुम्ही आकडे पाहिले तर ते स्वतःच आपली गोष्ट सांगत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
Covid 19 Vaccine: स्वदेशी COvaxin च्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलची घोषणा