एक्स्प्लोर

Climate Change : 2050 पर्यंत जगासमोर भीषण संकट, वातावरणात होतील 'हे' बदल

Climate Change: हवामानात होणाऱ्या बदलांमुळे येणाऱ्या काळात आम्हाला अनेक संकटाचा सामना करावा लागू शकतो. याचा सगळ्यात जास्त परिणाम लहान मुलांवर होणार आहे.

Climate Change : आपल्या आजूबाजूच्या वातावरणात अनेक बदल होत आहेत. संपूर्ण जग भीषण पर्यावरणीय संकटाचा सामना करत आहे. बहुतांश देशात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. यामुळे सगळ्या जगाला हवामान बदलाचे (Climate Change) परिणाम भोगावे लागत आहेत. यामध्ये येणाऱ्या काळात आणखीन वाढ होण्याचा धोका आहे. यापूर्वीच अनेक शास्त्रज्ञांनी जागतिक तापमान वाढीबाबत चिंता व्यक्त केली आहे. हवामान बदलांमुळे हिमनग वितळण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढत आहेत. जर वातावरणातील प्रदूषण असेच वाढत राहिले, तर येणाऱ्या दिवसांत तापमान वाढ होणार आहे. या तापमान वाढीचा वाईट परिणाम मुलांवर होऊ शकतो. याविषयी सविस्तर जाणून घेऊया...

पृथ्वीच्या तापमानात होईल वाढ :

हवामानातील वाढत्या तापमानामुळे तणाव आणि नवजात शिशूंचा जन्म वेळेआधी होण्याचे प्रमाण वाढेल. तसेच आपली विचार करण्याची क्षमता कमी होईल. 1850 पासून ते 1900 पर्यंतचा काळ औद्योगिक पूर्व जग म्हणून ओळखले जाते. 1850 पासून ते 2020 पर्यंत तापमानात सरासरी 1.1  डिग्री सेल्सियसची वाढ झाली आहे.  खनिज तेलाच्या अतिवापरामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साई़डचे प्रमाण वाढले. ही गेल्या 2000 हजार वर्षातील सर्वाधिक तापमान वाढ आहे. 

वाढत्या तापमानामुळे वाढतील समस्या :

'दैनिक भास्कर'च्या एका रिपोर्टनुसार, वाढत्या तापमानामुळे तणाव वाढेल. यामुळे हृदयविकाराशी संबंधित समस्या आणि स्ट्रोक्समध्येही वाढ होईल. प्रसुतीपूर्व जन्मदर आणि बाल मृत्यूदरांमध्ये वाढ होऊ शकते. यामुळे आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. अतिवृष्टीच्या घटना वाढतील आणि दरवर्षी दीड लाख लोक मृत्यूमूखी पडतील. यामुळे जवळपास दीड कोटी लोकांवर परिणाम होईल. 

पावसाच्या वेळापत्रकात होईल बदल

तापमानवाढीमुळे बाष्पीभवनाच्या क्रियेत वाढ होईल. यामुळे पावसाचे प्रमाण वाढेल. काही परिसरात जास्त पाऊस, तर काही परिसरात कमी पाऊस पडू शकतो. यामुळे ओला आणि कोरडा दुष्काळ पडतो. 'ग्रीनपीस ईस्ट आशिया'च्या रिपोर्टनुसार,  2023 पर्यंत समुद्रातील पाण्याची पातळी वाढेल. यामुळे सात आशियन शहरातील कमीत कमी दीड कोटी लोक आणि 1829 वर्गकिलोमीटरच्या जमिनीच्या भागावर परिणाम होईल. या रिपोर्टनुसार, 2030 पासून ते 2050 पर्यंत अनेक प्रकारच्या रोगांचा लोकांना संसर्ग होईल. यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल.

समुद्र होईल आम्लधर्मीय :

हवेतील वाढलेले कार्बन डाय ऑक्साईड आणि ग्रीन हाऊस गॅसचे समुद्राच्या पाण्यात मिसळत आहे. यामुळे समुद्र आम्लधर्मीय होत आहे. यामुळे समुद्रातील अनेक सजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.

इतर बातम्या वाचा :

Climate Change : ग्लोबल वॉर्मिंगमुळे 82 टक्के भारतीय चिंतेंत, अहवालातून झाले स्पष्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar on Yugendra Pawar : मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
Rohit Pawar: अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही;न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
Ajit Pawar in Baramati: बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Justice Chandiwal EXCLSUIVE : Anil Deshmukh यांना क्लीनचिट? न्यायमूर्ती चांदीवाल यांची स्फोटक मुलाखतJustice KU Chandiwal : Sachin Waze यांनी शपथपत्रानुसार साक्षीपुरावे दिले असते तर उलगडा झाला असताTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaAsauddin Owaisi on PM Modi:भाजपच्या 'एक हैं तो सैंफ है'ला ओवैसींचं उत्तर;म्हटले अनेक हैं तो अखंड हैं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar on Yugendra Pawar : मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
Rohit Pawar: अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही;न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
Ajit Pawar in Baramati: बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
Sachin Waze: सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न, मी ते रेकॉर्डवर घेतले नाही: न्यायमूर्ती चांदिवाल
सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न, मी ते रेकॉर्डवर घेतले नाही: न्यायमूर्ती चांदिवाल
राज ठाकरेंच्या विक्रोळीतल्या सभेत संजय राऊतांसाठी 'रिकामी खुर्ची'; मनसैनिकांनी धाडलेलं आग्रहाचं निमंत्रण, कारण काय?
राज ठाकरेंच्या विक्रोळीतल्या सभेत संजय राऊतांसाठी 'रिकामी खुर्ची'; मनसैनिकांनी धाडलेलं आग्रहाचं निमंत्रण, कारण काय?
Embed widget