Long March 5B : अवकाशात भरकटलेलं चीनचं रॉकेट आज कोणत्याही क्षणी पृथ्वीवर 'या' भागात धडकणार
मागील महिन्यात लाँच झाल्यानंतर या रॉकेटनं आपलं मिशन पूर्ण केलं. पण, पृथ्वीवरु परतण्यापूर्वीच चीनचा रॉकेटवरील ताबा सुटला, ज्यामुळं ही परिस्थिती ओढावली आहे.
Long March 5 अवकाशात भरकटलेलं आणि चीनच्या नियंत्रणाबाहेर असणारं रॉकेट लाँग मार्च 5 मोठ्या वेगानं पृथ्वीच्या दिशेनं येत आहे. आज कोणत्याही क्षणी हे रॉकेट पृथ्वीवर धडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील वर्षी चीनमधील अंतरिक्ष केंद्रावरून हे रॉकेट प्रक्षेपित करण्यात आलं होतं. अमेरिकेतील ट्रॅकिंग सेंटर आणि रॉयटरच्या माहितीनुसार हे भरधाव वेगात असणारं भरकटलेलं रॉकेट पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करत आहे. काही वैज्ञानिकांच्या माहितीनुसार न्यूझीलंडनजीक हे रॉकेट कोसळू शकतं.
अमेरिकेतील संरक्षण विभाग या रॉकेटच्या अवशेषांवर लक्ष ठेवून आहे. चीनमधील तज्ज्ञांच्या माहितीनुसार या रॉकेटचे काही अवशेष समुद्रात पडतील. मुख्य म्हणजे वातावरणात प्रवेश करताच रॉकेटचे तुकडे-तुकडे होतील.
मोदी सरकारकडून कोरोना नव्हे, ट्विटरवरील टीकांना हटवण्यास प्राधान्य, लँसेटमधून ताशेरे
चीननं 29 एप्रिलला 'लाँग मार्च 5बी' या मेहिमेअंतर्गत हायनाईन बेटावरुन हे रॉकेट लाँच करण्यात आलं होतं. हे रॉकेट एका मॉड्यूलसर स्पेस स्टेशनपर्यंत गेलं. मॉड्यूल निर्धारित कक्षेत सोडल्यानंतर हे रॉकेट पृथ्वीवर परतणं अपेक्षित होतं. पण, तसं झालं नाही. 18 टन इतकं या रॉकेटचं वजन आहे. मागील कैक दशकांमध्ये पृथ्वीच्या वातावरणात अनियंत्रीत होत धडकणारी ही सर्वाधिक मोठी वस्तू ठरत आहे.
सध्याच्या घडीला परिस्थितीचं गांभीर्य पाहता, अमेरिकेसमवेत अनेक राष्ट्र या रॉकेटवर नजर ठेवून आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार चीननं असा विश्वास दिला आहे, की पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच या रॉकटे तुकडे होऊन ते नष्ट होईल. ज्यामुळं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. सहसा रॉकेटचे अवशेष वातावरणात प्रवेश करतात पेट घेऊन नष्ट होतात. याचा फार कमी भाग अस्तित्वात राहण्याची शक्यता असते, जो भाग पृथ्वीपर्यंत पोहोचतो. त्यामुळं हे अवशेष अतिशय लहान स्वरुपात असतात.
#LongMarch5B Update1
— Mayuresh Prabhune (@mayureshgp) May 8, 2021
अद्ययावत अंदाजानुसार चीनच्या लॉंगमार्च रॉकेटच्या अवशेषांचा सध्या तरी भारताला धोका नाही. पुढील काही तासांत रॉकेटचे अवशेष वातावरणात प्रवेश करण्याची शक्यता. pic.twitter.com/agCRBmGpQR