(Source: ECI/ABP News/ABP Majha)
China : बीजिंग ते न्यूयॉर्क फक्त एका तासात प्रवास! ड्रॅगन बनवतोय हाय-टेक हायपरसोनिक विमान
चीनच्या एका कंपनीने हायपरसॉनिक विमान बनवण्याची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे हायपरसॉनिक विमान बीजिंग आणि न्यूयॉर्क दरम्यान अवघ्या एका तासात उड्डाण करू शकेल.
चीन (china) लवकरच हायपरसॉनिक विमान (hypersonic plane) बनवणार आहे, जे अतिशय वेगाने उड्डाण करणार आहे. चीनच्या एका कंपनीने हायपरसॉनिक विमान बनवण्याची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे हायपरसॉनिक विमान बीजिंग (beijing) आणि न्यूयॉर्क (new york) दरम्यान अवघ्या एका तासात उड्डाण करू शकेल.
बीजिंग ते न्यूयॉर्क अवघ्या एका तासात प्रवास
असा दावा करण्यात येतोय की, या विमानाचा वेग खूप जास्त असेल. तसेच या विमानाची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, ते सुमारे 7000 मैल प्रतितास वेगाने उड्डाण करू शकेल. शास्त्रज्ञांना आशा आहे की, हे हायपरसॉनिक विमान वर्ष 2024 पर्यंत तयार होईल. या चिनी विमानाबाबत 'द सन' स्पेस डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, स्पेस ट्रान्सपोर्टेशन नावाची कंपनी फ्युचरिस्टिक प्लेन (futuristic plane) बनवत आहे. असे सांगण्यात येत आहे की, टेक ऑफ केल्यानंतर हे विमान रॉकेटच्या (rocket plane) शक्तीने पंखांपासून वेगळे केले जाईल. तेच विंग्स आणि बूस्टर पुन्हा लॉन्च पॅडवर परत येतील. हे हायटेक विमान चीनची राजधानी बीजिंग (beijing) ते न्यूयॉर्कपर्यंत (new york) अवघ्या एका तासात प्रवास करू शकणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
चीनच्या हायटेक प्लॅनपैकी एक
हायपरसोनिक विमान ही चीनच्या हायटेक प्लॅनपैकी एक आहे. हायटेक विमाने तयार करण्यासाठी चीनने मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. गेल्या वर्षीही चीनकडून अशा हायटेक विमानाची योजना समोर आणली गेली, जी केवळ एका तासात पृथ्वीवर कुठेही 10 लोकांना घेऊन जाऊ शकते. साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, 148-फूट हायपरसोनिक विमान बोईंग 737 पेक्षा मोठे आहे. या आधुनिक विमानाच्या डिझाईनमध्ये दोन इंजिन बसवण्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.