Pneumonia Outbreak : चीनमधील रहस्यमयी आजार कोरोनाचाच व्हेरियंट? ड्रॅगन पुन्हा महामारी लपवतेय
Pneumonia Outbreak in China: चीननं पुन्हा एकदा जगाची धाकधूक वाढवली आहे. चीनमध्ये कोरोनासारख्याच रहस्यमयी आजाराचा उद्रेक झालाय, त्यामुळे जगभरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण तयार होतेय.
Pneumonia Outbreak in China: चीननं पुन्हा एकदा जगाची धाकधूक वाढवली आहे. चीनमध्ये कोरोनासारख्याच रहस्यमयी आजाराचा उद्रेक झालाय, त्यामुळे जगभरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण तयार होतेय. चीनमध्ये लहान मुलांमध्ये रहस्यमयी आजार वाढलाय, त्यामुळे रुग्णालयातील बेड्स भरले आहेत. हा रहस्यमयी आजार निमोनिया असल्याचे बोलले जातेय. चीनमधील या आजाराकडे भारत सरकारचे बारीक लक्ष आहे. भारत सरकारने त्याबाबत अॅडवायझरी जारी केली आहे. चीनमधी या रहस्यमयी रोगाबद्दल नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे माजी महासंचालकांनी सांगितलं. ते म्हणाले की, चीनला आजार लपवण्याची सवय आहे. अशा स्थितीत आपण अधीच तयार असायला हवं. चीनने डब्ल्यूएचओला (जागतिक आरोग्य संघटना) दिलेल्या माहितीनुसार, नवीन फ्लू स्ट्रेन किंवा इतर विषाणूंचा प्रसार होण्याचे प्रमुख कारण श्वसनाचे आजार होय.
याबाबत डब्ल्यूएचओने सांगितले की, चीनी आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरुवारी टेलिकॉन्फरन्स दरम्यान या आजारासंदर्भातील माहितीचा डेटा मिळाला. त्यामुळे ऑक्टोबरपासून विषाणूचा संसर्ग, आरएसव्ही, इन्फ्लूएंझा आणि सामान्य सर्दीसह आजारांमुळे मुलांच्या रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले.
मुबलक माहिती नाही -
रहस्यमयी आजाराबाबत चीनकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सध्या WHO काहीही बोलण्याच्या स्थितीत नाही. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की मुलांमध्ये श्वसनाच्या आजाराबाबत रिपोर्ट मिळाले. या अहवालाच्या आधारावर जोखमीचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी सध्या खूप कमी माहिती आहे.
भारतामधील स्थिती काय ?
आपल्या देशात सध्या श्वसनाच्या काही असामान्य केसेस (अनयूजुअल रेस्पिरेटरी) पाहायला मिळत आहेत. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे आणि दुसरीकडे या आजाराने त्रस्त असलेल्यांमध्ये दीर्घकाळ प्रादुर्भाव सुरूच आहे. सर्धी अथवा खोकला यासारखे आजार झाल्यास त्यातून सावरण्यास वेळ लागतो. त्यामुळे आपण जास्त चिंतेत नसतो. पण रुग्णालयात जायची वेळ आल्यास आपली चिंता अधिक वाढते.
भारतामध्ये भीतीदायक स्थिती किती ?
चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे काय स्थिती झाली होती, हे आपल्याला चांगलेच माहिती आहे. हा कोरोनाचाही व्हेरियंट अशू शकतो. हा आजार चीनमध्ये वेगाने पसरत आहे. त्याबाबत अधिक माहिती कुणालाही नाही.
चीनमधील या रहस्यमयी आजाराबाबत भारत अधीच जागृक झालाय. भारताने आपली तयाराही सुरु केली आहे. प्रत्येक राज्यात नियमांवली जारी करण्यात आली आहे. आपण त्याबाबत पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने तयारी करत आहोत.
संसर्गच आहे...
वुहानमध्ये ज्या पद्धतीने रुग्णालयात लहान मुलांना उपचारासाठी दाखल करण्यात येते, त्यावरुन हा नक्कीच संसर्गजन्य आजार आहे. ते म्हणाले की, कोणत्या प्रकारचा संसर्ग आहे हे देखील पाहावे लागेल. ड्रॉप लेटमुळे हा आजार पसरत आहे की इतर कोणत्या मार्गाने याबाबत पाहावे लागेल.
हा रहस्यमयी आजार कसा ट्रेंड होतोय, त्याशिवाय भविष्यात तो कोणतं रुप घेऊ शकतो? कोणताही रोग किंवा कोणतीही लक्षणे लपवू नयेत. चीनमध्ये आपण यापूर्वी दोन-तीन वेळा असे दृश्य नक्कीच पाहिले आहे. जिथे फारशी वैज्ञानिकदृष्ट्या योग्य माहिती सापडलेली नाही. सध्या WHO त्याच्या संपर्कात आहे. चीन सरकार आणि WHO यांच्यात नक्कीच चर्चा होणार आहे. त्यानंतर WHO ने इतर सर्व देशांना याबाबत सतर्क केले पाहिजे.