एक्स्प्लोर

आधी कोरोनाचा उगम; आता ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला, चीनचे टेन्शन वाढलं 

Omicron Outbreak in China: कोरोनाचा विळखा मागील काही महिन्यांत सैल होत आहे, असे वाटत असतानाच ओमायक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटने जन्म घेतल्याने संपूर्ण जगाची चिंता पुन्हा वाढली आहे.

Omicron Outbreak in China: चीनमध्ये सोमवारी ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळलाय. स्थानिक प्रसारमाध्यमांनी याबाबतचं वृत्त दिले आहे. CGTN या स्थानिक प्रसारमाध्यमांनी सोमवारी चीनमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण आढळल्याचे वृत्त दिले आहे. 2019 मध्ये चीनमध्ये पहिल्यांदा कोरोनाचा उगम झाला होता. मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीने जगभराचं टेन्शन वाढवलं आहे. विदेशातून उत्तर चीनमध्ये आलेल्या व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 

CGTN या स्थानिक प्रसारमाध्यामाने ट्वीट करत चीनमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळल्याचं सांगितलं. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलेय की, " सोमवारी चीनमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केलाय. उत्तर चीनमधील थियानजिनमध्ये विदेशातून आलेल्या एका व्यक्तीला ओमायक्रॉनची बाधा झाल्याचं स्पष्ट झालेय."
 
जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच  WHO ने 27 नोव्हेंबर रोजी या व्हेरियंटचं नामकरण ओमायक्रॉन (B.1.1.529) असं केलं आहे. हा व्हेरियंट सर्वात आधी दक्षिण आफ्रिकामध्ये आढळला होता. त्यानंतर जगभरात अतिशय वेगानं पसरत आहे. प्रत्येक देशानं विदेशातून येणाऱ्या नागरिकांवर करडी नजर ठेवली आहे. विदेशातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी केली जात असून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं ओमायक्रॉन या व्हिरेयंटबाबत जगाला सावध राहण्याचा सल्ला दिलाय. दक्षिण आफ्रिकाशिवाय, युरोप, कॅनडा, इस्राइल आणि हाँगकाँगमध्येही ओमायक्रॉनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलेय. आधीच्या कोरोना व्हेरियंटपेक्षा ओमायक्रॉन व्हेरियंटचा अधिक वेगानं संसर्ग होत आहे. तसेच हा व्हेरियंट रोग प्रतिकारकशक्तीवर थेट हल्ला करु शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलेय. 

 ओमायक्रॉन व्हेरियंटचा जगात पहिला बळी
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी युकेमध्ये ओमायक्रॉन या व्हेरियंटची लागण होऊन किमान एका रुग्णाचा जीव गेल्याची माहिती दिली आहे. या माहितीमुळे ओमायक्रॉन व्हेरियंटही जीवघेणा असल्याचे समोर आल्याने जगभरातील नागरिकांची चिंता वाढली आहे. बोरिस यांनी वेस्ट लंडनमधील पॅडिंग्टन येथे एका लसीकरण क्लिनीकला भेट देण्यासाठी आले असताना त्यांनी याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले,''दुर्देवाने ओमायक्रॉन चिंता वाढवत असून या व्हेरियंटची लागण झालेल्यांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. तसंच किमान एका व्यक्तीचातरी आतापर्यंत ओमायक्रॉनची लागण होऊन मृत्यू झाला''

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : गोविंदा... मिसफायर आणि टाइमलाईन ; संपूर्ण घटनाक्रम एका क्लिकवरABP Majha Headlines : 7 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 न्यूज : 05 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 01 October 2024 : ABP MajhaVare Nivadnukiche Superfast News 05 PM: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे: 01 Oct 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Embed widget