एक्स्प्लोर

Covid-19 : चीनने वाढवलं जगाचं टेन्शन; कोरोनाचा कहर, 20 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता : रिपोर्ट

China Corona Update : चीनमध्ये गेल्या आठवड्यात कोविड निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. पण कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

China Coronavirus Deaths : चीनने (China) पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा वेगाने कोरोना संसर्ग पसरताना दिसत आहे. चीनमधील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. अनेक प्रांतामध्ये कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. या दरम्यान, हाँगकाँगमधील एका रिपोर्टने चिंता अधिक वाढवली आहे. हाँगकाँगमधील  शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार, एका संशोधनानुसार, चीनमध्ये 20 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे चीन सरकारने कोरोना निर्बंध हटवले आहेत. 

ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, चीनमधील 1.41 बिलियन लोकसंख्येच्या आधारावर सुमारे 9,64,400 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होईल. हाँगकाँगमधील शास्त्रज्ञांनी सांगितलं की, संशोधनानुसार चीनमधील सर्व प्रांतांमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रसार थोपवण्यात आणि संसर्गाचा सामना करण्यात आरोग्य प्रशासन असमर्थ ठरेल.

मृत्यू कसे रोखता येतील?

संशोधकांच्या रिपोर्टनुसार, चीनमध्ये पर्यंत कठोर निर्बंध आणि लॉकडाऊन लागू करण्याची आवश्यकता आहे. जानेवारी 2023 चीनमधील लॉकडाऊन हटवण्यात येऊ नये. कोरोना लसीकरणात वाढ आणि अँटीव्हायरल औषधांचा पुरेसा साठा यामुळे कोरोना मृत्यू कमी करण्यात मदत होईल. यामुळे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 26 टक्क्यांनी कमी होईल.

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर

चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर सुरु आहे. अशातच सरकारने पुन्हा एकदा झिरो कोविड नियम लागू केले होते. मात्र, नागरिकांनी सरकारविरोधात आंदोलन करत सरकारला निर्बंध मागे घेण्यास भाग पाडले. त्यामुळे सरकारने गेल्या आठवड्यापासून कोविड निर्बंध शिथिल केले आहेत. पण परिणामी चीनमधील परिस्थिती अधिक बिघडत चालली आहे. कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. व्हायरल फ्लू आणि ताप या सारख्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत.

राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाचा वाढता कहर

बीजिंगच्या आरोग्य विभागाचे प्रवक्ते ली आंग यांनी सोमवारी एका ब्रीफिंगमध्ये सांगितले, 'बीजिंगमध्ये साथीच्या रोगाचा वेगवान प्रसार होणं सुरुच आहे.ताप आणि फ्लू सदृश प्रकरणांमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. तापाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 

आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

आरोग्य सल्लागार झोंग यांनी चीन सरकारला कोरोनाबाबत इशारा दिला आहे. झोंग यांनी म्हटलं आहे की, 'सध्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा अधिक संसर्ग झाल्याचं दिसून येत आहे. एक व्यक्ती सुमारे 22 लोकांना विषाणूचा प्रसार करू शकतो. चीनमध्ये सध्या कोरोना रोग वेगाने पसरत आहे, अशा परिस्थितीत कोविड प्रतिबंध आणि नियंत्रण कितीही मजबूत असले तरीही संक्रमण साखळी पूर्णपणे तोडणे कठीण होणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CSK vs LSG : ऋतुराजचं धमाकेदार शतक, दुबेचं अर्धशतकी खेळी; लखनौला 211 धावांचं आव्हान
ऋतुराजचं धमाकेदार शतक, दुबेचं अर्धशतकी खेळी; लखनौला 211 धावांचं आव्हान
Juna Furniture : आई-वडिलांना गृहित धरणाऱ्यांनी पाहावा असा 'जुनं फर्निचर'; महेश मांजरेकर म्हणतात...
आई-वडिलांना गृहित धरणाऱ्यांनी पाहावा असा 'जुनं फर्निचर'; महेश मांजरेकर म्हणतात...
Ayushmann Khurrana : आयुष्मान खुरानाने केली इंडस्ट्रीची पोलखोल; म्हणाला,
आयुष्मान खुरानाने केली इंडस्ट्रीची पोलखोल; म्हणाला,"संपूर्ण बॉलिवूड रेंटवर आहे"
Sharad Pawar : मोदींच्या विरोधात लोकांमध्ये रोष, म्हणून आता हिंदू- मुस्लिम केलं जातंय; शरद पवारांचा हल्लाबोल
मोदींच्या विरोधात लोकांमध्ये रोष, म्हणून आता हिंदू- मुस्लिम केलं जातंय; शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Bachchu Kadu Rada : बच्चू कडूंना जाहीर सभेसाठी 3 मैदानांता पर्याय, बच्चू कडू काय म्हणाले?Sharad Pawar Special Report : पुण्यातून शरद पवार लोकसभेच्या रिंगणात? पाहा स्पेशल रिपोर्टUddhav Thackeray On BJP : परभणीतून उद्धव ठाकरेंचा महायुतीवर निशाणा ABP MajhaTutari Special Report : बारामतीत चिन्हावरून वादाची 'तुतारी' वादात नवा ट्विस्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK vs LSG : ऋतुराजचं धमाकेदार शतक, दुबेचं अर्धशतकी खेळी; लखनौला 211 धावांचं आव्हान
ऋतुराजचं धमाकेदार शतक, दुबेचं अर्धशतकी खेळी; लखनौला 211 धावांचं आव्हान
Juna Furniture : आई-वडिलांना गृहित धरणाऱ्यांनी पाहावा असा 'जुनं फर्निचर'; महेश मांजरेकर म्हणतात...
आई-वडिलांना गृहित धरणाऱ्यांनी पाहावा असा 'जुनं फर्निचर'; महेश मांजरेकर म्हणतात...
Ayushmann Khurrana : आयुष्मान खुरानाने केली इंडस्ट्रीची पोलखोल; म्हणाला,
आयुष्मान खुरानाने केली इंडस्ट्रीची पोलखोल; म्हणाला,"संपूर्ण बॉलिवूड रेंटवर आहे"
Sharad Pawar : मोदींच्या विरोधात लोकांमध्ये रोष, म्हणून आता हिंदू- मुस्लिम केलं जातंय; शरद पवारांचा हल्लाबोल
मोदींच्या विरोधात लोकांमध्ये रोष, म्हणून आता हिंदू- मुस्लिम केलं जातंय; शरद पवारांचा हल्लाबोल
पुणे पोलिसांचा मुळशी पॅटर्न; कुख्यात गुंड नव्याचा सिनेस्टाईल थरार, पाठलाग करुन अटक
पुणे पोलिसांचा मुळशी पॅटर्न; कुख्यात गुंड नव्याचा सिनेस्टाईल थरार, पाठलाग करुन अटक
उद्धव ठाकरेंची भरपावसात सभा; जानकरांचं डिपॉझिट जप्त करा, मोदींवरही जोरदार निशाणा
उद्धव ठाकरेंची भरपावसात सभा; जानकरांचं डिपॉझिट जप्त करा, मोदींवरही जोरदार निशाणा
अमित शाहांकडून जय भवानी जय शिवाजीचा जयघोष; अकोल्यातील सभेतून उद्धव ठाकरेंना डिवचलं
अमित शाहांकडून जय भवानी जय शिवाजीचा जयघोष; अकोल्यातील सभेतून उद्धव ठाकरेंना डिवचलं
Web Series : 'Aarya' ते 'Criminal Justice'; हॉटस्टारवर नक्की पाहा 'या' थरार, नाट्य असणाऱ्या धमाकेदार वेबसीरिज
'Aarya' ते 'Criminal Justice'; हॉटस्टारवर नक्की पाहा 'या' थरार, नाट्य असणाऱ्या धमाकेदार वेबसीरिज
Embed widget