एक्स्प्लोर

Coronavirus : कोरोनाचा उगम कसा आणि कुठे झाला? WHO ने चीनकडे मागवला अहवाल

WHO On Corona : जागतिक आरोग्य संघटना (WHO) प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी कोरोनाचा उगम कसा आणि कुठे झाला याबाबत चीनकडून अहवाल मागवला आहे.

WHO On Coronavirus Origin : जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) कोरोनाचा उगम (Coronavirus) कसा झाला याचा अहवाल मागवला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी बुधवारी चीनला (China) कोरोना विषाणूचे मूळ (Coronavirus Origin) समजून घेण्यासाठी कोविड-19 (Covid 19) शी संबंधित डेटा शेअर करण्याचे आवाहन केलं आहे. जगभरात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला, तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही. अद्यापही अनेक देशांमध्ये कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग वाढताना दिसत आहे. चीनला कोरोनाचं उगम स्थान मानलं जातं. कोरोना विषाणू संदर्भात चीनवर अनेक आरोपही करण्यात आले आहेत. 

जागतिक आरोग्य संघटनेने वेबसाइटवर निवेदनात डब्ल्यूएचओ प्रमुख यांनी म्हटलं आहे की, 'आम्ही चीनला कोरोना विषाणूचे मूळ अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी कोरोनाचा उगम आणि त्यासंदर्भातील अधिक माहितीचा अहवाल देण्यास सांगितलं आहे.'

कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण चीनच्या वुहानमध्ये सापडला होता. त्यानंतर तिथून त्याचा प्रसार झाला. एका अमेरिकन शास्त्रज्ञाने दावा केला आहे की, कोरोना व्हायरस हा मानवनिर्मित व्हायरस आहे. अमेरिकन शास्त्रज्ञाने आपल्या पुस्तकात म्हटले आहे की, हा विषाणू निर्माण करण्यासाठी चीनसोबत अमेरिकाही जबाबदार आहे. 

'कोरोना विषाणू मानव निर्मित', वुहानमधील शास्त्रज्ञाचा दावा

अलिकडेच चीनमधील (China) वुहानमधील (Wuhan) एका प्रयोगशाळेत (Lab) काम करणाऱ्या शास्त्रज्ञाने कोरोना विषाणू वुहानमधील लॅबमध्ये (Wuhan Lab) तयार करण्यात आलं असल्याचा दावा केला आहे. वुहानमधील एका प्रयोगशाळेत काम करणाऱ्या अमेरिकन शास्त्रज्ञाने त्याचा पुस्तकामध्ये हा दावा केला आहे. या शास्त्रज्ञाने त्याच्या पुस्तकात आहे की, कोरोना विषाणू वुहानमधील प्रयोगशाळेत तयार करण्यात आला असून ते मानव निर्मित (Man Made Virus) आहे. अँड्रयू हफ (Andrew Huff) या वुहानमधील लॅबमध्ये काम केलेल्या शास्त्रज्ञाने त्याच्या पुस्तकामध्ये दावा केला आहे की, कोरोना विषाणू चीनमधील लॅबमध्ये तयार करण्यात आला होता. 

कोरोना विषाणू कसा पसरला?

अहवालानुसार, तज्ज्ञांनी आतापर्यंत कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबद्दल दोन प्रमुख सिद्धांत मांडले आहेत. पहिला सिद्धांत असा आहे की, SARS-CoV-2 हा नैसर्गिक झुनोटिक स्पिलओव्हरचा (Zoonotic Diseases)परिणाम आहे. दुसरा सिद्धांत असा आहे की, हा विषाणू लॅबमध्ये तयार करण्यात आला आणि संशोधनादरम्यान या विषाणूची मानवाला बाधा झाली. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख म्हणाले की, 'आम्ही आशावादी आहोत की, पुढील वर्षी कोविड -19 साथीच्या रोगाचा धोका कमी होईल आणि कोरोनाला जागतिक आरोग्य आणीबाणी मानलं जाणार नाही.'

झुनोटिक रोग म्हणजे काय? (Zoonotic Diseases)

झुनोटिक रोग म्हणजे असे रोग आहेत जे सामान्यत: काही प्रजातींमध्ये (मानवी शरीरात नाही) अस्तित्वात असतात. परंतु स्पिलओव्हर इव्हेंट्स दरम्यान या विषाणूचा मानवाला संक्रमण होतं. झुनोटिक स्पिलओव्हरमध्ये विविध पाळीव आणि पाळीव प्राणी नसलेल्या वन्य प्राण्यांपासून मानवाला संक्रमण होते. म्हणजे झुनोटिक रोग एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीत संक्रमित होतात.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार

व्हिडीओ

Mahapalika Mahasangram Akola : अकोल्यात पालिका निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार?
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalika Mahasangram Jalna : भ्रष्टाचाराच्या मुद्यावर स्थानिकांचं मत काय? जालनाकर काय म्हणाले?
Manda Mhatre On Ganesh Naik आणि माझ्यातील शीतयुद्ध संपले, दोघे मिळून नवी मुंबईवर भगवा फडकवणार
Thackeray Brother Alliance : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा ठाकरे बंधू एकत्र घेणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
हायकोर्टाचा दणका, विशाल अगरवालचा जामीन फेटाळला; पुणे पोर्शे कार अपघात, मुलाचा बाप 17 महिन्यांपासून तुरुंगात
हायकोर्टाचा दणका, विशाल अगरवालचा जामीन फेटाळला; पुणे पोर्शे कार अपघात, मुलाचा बाप 17 महिन्यांपासून तुरुंगात
Embed widget