Cash Flew Out of Vehicle in California: 'पैशांचा पाऊस!' ; ट्रकमधून उडून आल्या नोटा, पैसे गोळा करायला लोकांची गर्दी, पाहा व्हिडीओ
पैशांचा पाऊस पडला तर काय होईल? असा विचार अनेक जण करतात. कॅलिफोर्नियामध्ये अशीच एक घटना नुकतीच घडली आहे.
Cash Flew Out of Armored Vehicle in California : पैशांचा पाऊस पडला तर काय होईल? असा विचार अनेक जण करतात. कॅलिफोर्नियामध्ये अशीच एक घटना नुकतीच घडली आहे. अचानक एका ट्रकमधून पैसे उडत रस्त्यावर पडले आणि ते पैसे गोळा करायला लोकांनी गर्दी केली. कॅलिफोर्निया हायवे पेट्रोल विभागाने (CHP) दिलेल्या माहितीनुसार ही घटना कार्लसबॅडमधील इंटरस्टेट-5 या महामार्गावर घडली आहे. एका ट्रकमधील कॅश रस्त्यावर उडून आली आणि तिथले लोक गाडीमधून उतरून ती कॅश गोळा करण्यासाठी जमा झाले होते. त्यामुळे महामार्गावर ट्रॅफिक जॅम झाले.
CHP चे अधिकारी कर्टिस मार्टिन यांनी आउटलेट केएनएसडीला दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचा एक दरवाजा उघडला आणि त्यामधून नोटा उडू लागल्या. त्यानंतर ट्रकमधील कॅश रस्त्यावर पडली. CHP यांनी सांगितले की, पैसे उचलणाऱ्यांना दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच इतरांना देखील अटक होऊ शकते. CHP ने लोकांना ते पैसे परत देण्यास सांगितले आहेत.
View this post on Instagram
दोघांना अटक
कायदा प्रवर्तन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की ट्रकमधून उडालेले पैसे उचलणाऱ्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी असलेल्या गाड्यांच्या नंबर प्लेट आणि लोकांचे चेहरे पाहून त्यांची तपासणी करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. डेमी बागबी यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये रस्त्यावर पैसे पडलेले दिसत आहेत. या व्हिडीओला डेमी बागबी यांनी कॅप्शन दिले, 'तुम्ही असे दृष्य कधी पाहिले आहे का? हे पाहिल्यानंतर तुम्ही काय केले असते?'