एक्स्प्लोर
देव तारी त्याला... भीषण कार अपघातातून ड्रायव्हरसह महिलाही बचावली!

निंगबो (चीन): तुमच्या आयुष्याची दोरी जर बळकट असेल तर कितीही मोठ्या अपघातातून तुम्ही वाचू शकता. याचा नुकताच प्रत्यय चीनच्या निंगबो शहरात आला. एका भरधाव वेगाने येणाऱ्या सिमेंट टँकरने एका चारचाकीला धडक दिली. स्वतःला वाचवण्यासाठी ड्रायव्हरने हँड ब्रेकही मारला पण तोपर्यंत टँकरने गाडीचा अक्षरशः चक्काचूर केला.
काही काळातच स्थानिक प्रशासनाचं बचाव पथक आलं आणि त्यांनी चारचाकीतील महिलेला बाहेर काढलं. यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने गाडीच्या चालकालाही सुखरुप बाहेर काढलं. या अपघातात दोघेही जखमी झाले असून सध्या या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं आहे.
काही काळातच स्थानिक प्रशासनाचं बचाव पथक आलं आणि त्यांनी चारचाकीतील महिलेला बाहेर काढलं. यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने गाडीच्या चालकालाही सुखरुप बाहेर काढलं. या अपघातात दोघेही जखमी झाले असून सध्या या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं आहे. आणखी वाचा























