Viral News : लग्नात नववधूची खास स्टाईलमध्ये एंट्री, व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल
Viral News : सध्या नववधू तिच्या लग्नासाठी एका खास स्टाईलमध्ये दाखल होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वधू एखाद्या देवदूतापेक्षा कमी दिसत नाही.
Viral News : सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. वधू-वरांना त्यांच्या लग्नाला खास बनवण्यासाठी त्यांची एंट्री स्पेशल करायची असते, त्यामुळे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. जे पाहून प्रत्येकाला म्हणायला भाग पडेल की ही नववधू खरोखरच तिच्या वडिलांसाठी एखादी परी किंवा राजकुमारी आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वधू तिच्या लग्नासाठी एका खास पद्धतीने एंट्री घेताना दिसत आहे. ज्यामध्ये वधूचा ड्रेस फुग्याच्या मदतीने हवेत उडताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला असल्याचं दिसत आहे.
सोशल मीडियावर समोर आलेला हा व्हिडिओ पाहता, असा अंदाज लावला जाऊ शकतो की वधूला तिच्या लग्नात एखाद्या राजकुमारी किंवा परीप्रमाणेच खास एंट्री करायची इच्छा होती. त्यामुळे समोर आलेला व्हिडिओ पाहिल्यावर वधूचे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे. वधूचा गाऊन किंवा ड्रेसच्या मागे असलेली ओढणी इतर कोणत्याही महिलेच्या हातात न धरता ती अनेक फुग्यांमध्ये बांधला असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी, स्टेजकडे जाणारी वधू एखाद्या राजकुमारीपेक्षा कमी दिसत नाहीय.
सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून, अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहेत. आतापर्यंत सोशल मीडियावर व्हिडिओला 13.7 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर एक दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांनी वधूच्या या एंट्रीला पसंती दिली आहे.
संबंधित बातम्या :
- Anushka Sharma On Vamika's Viral Photo: वामिकाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनुष्का शर्मा भडकली, नेटकऱ्यांनाही सुनावलं
- Tulsi Benefits for hair : केसांची हरवलेली चमक परत आणण्यास मदत करतील तुळशीचे पानं, पांढऱ्या केसांच्या समस्येवर गुणकारी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha