एक्स्प्लोर

Covaxin डीलची चौकशी करा; ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राष्ट्रपती बोलसोनारो यांच्या समोरील अडचणी वाढल्या

कोवॅक्सिन (Covaxin) लसीच्या खरेदीच्या करारात राष्ट्रपती जेर बोलसेनारो (Bolsanaro) यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. त्याच्या चौकशीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 

नवी दिल्ली : भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या खरेदीवरुन ब्राझीलचं राजकारण चांगलंच तापलंय. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने भारत बायोटेकसोबत झालेला दोन कोटी लस खरेदीचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या कराराची चौकशी 90 दिवसांच्या आत करावी आणि आपल्याला अहवाल सादर करावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे राष्ट्रपती जेर बोलसोनारो यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे. 

फेब्रुवारी 2021 मध्ये ब्राझील सरकारने हैदराबाद मधील लस निर्मिती कंपनी असलेल्या भारत बायोटेकशी दोन कोटी लसी खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. या कराराची एकूण रक्कम ही 2400 कोटी रुपये होती. या करारामध्ये मोठा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी ब्राझीलच्या राष्ट्रपतींवर केला होता. त्यानंतर हा करार रद्द करण्यात आला आहे.

ब्राझीलचे राष्ट्रपती जेर बोलसेनारो यांनी कोवॅक्सिनची लस ही मोठ्या किंमतीला खरेदी केली असून या करारात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. जगभरातील लसी या कमी किंमतीत उपलब्ध असतानाही राष्ट्रपतींनी जास्त किंमतीच्या कोवॅक्सिनला प्राधान्य दिल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. या प्रकरणी लुई मिरांडा यांनी संसदीय समितीकडे तक्रार केली होती. 

चौकशीसाठी 90 दिवसांची मुदत
कोवॅक्सिन डीलमध्ये नेमकं काय घडलं, यामध्ये काही अनियमितता आहेत का किंवा यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे का हे तपासण्यासाठी ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना 90 दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीमध्ये कोवॅक्सिन डीलची चौकशी करावी, संबंधित पुरावे तपासावेत आणि आपल्याला अहवाल सादर करावा असा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

हा करार रद्द झाल्यामुळे कोरोना लस निर्मिती करणारी स्वदेशी कंपनी भारत बायोटेकला मोठा धक्का बसला आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात सांगितलं आहे होतं की, कंप्ट्रोलर जनरल कार्यालयाच्या शिफारशीवरुन कोवॅक्सिन खरेदी करण्याचा करार रद्द करण्यात आला आहे. 

फेब्रुवारीमध्ये झालेल्या या करारात ब्राझीलच्या प्रेसिसा मेडिकामेंटोस ही कंपनीही भागिदार आहे. या करारावरुन ब्राझीलचे राजकारण चांगलंच तापलं होतं. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
Embed widget