एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

जगविख्यात बॉक्सर मोहम्मद अली यांचं निधन

न्यूयॉर्क : चॅम्पियन अशी जगविख्यात ख्याती असलेले बॉक्सर मोहम्मद अली यांचं निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यावर अमेरिकेतील रुग्णालयात उपचार सुरु होते. इथेच त्यांची प्राणज्योत मालवली.   मोहम्मद अलींना श्वसनाचा त्रास होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.   पार्किंसनमुळे श्वासाचा त्रास   श्वसनासह मोहम्मद अली पार्किंसन आजारानेही त्रस्त होते. या आजारामुळे कंपवाद होऊन शरीर थरथरतं, त्यामुळे शरीरावर  नियंत्रण राहात नाही.   1980 मध्ये आजाराचं कारण समोर   मोहम्मद अलींना पार्किंसनच्या आजाराबाबत 1980 मध्येच माहिती झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र पार्किंसनने अखेर त्यांना हरवलं.   कॉशियस क्ले ते मोहम्मद अली   पूर्वाश्रमीचा कॉशियस क्ले. एका कृष्णवर्णिय अमेरिकन कुटुंबात जन्मलेला सामान्य मुलगा. बारा वर्षांचा असताना क्ले एका सायकल चोराला बेदम चोप देणार होता. क्लेचा आवेष पाहून जो मार्टिन नावाच्या एका पोलिस अधिकारी आणि कोचने त्याला बॉक्सिंगकडे वळण्यास सांगितलं. क्लेने तो सल्ला मानला आणि जगाला मिळाला एक महान चॅम्पियन.. जगविख्यात बॉक्सर मोहम्मद अली यांचं निधन अठराव्या वर्षी क्लेचा बॉक्सिंगमध्ये ठसा   अवघ्या अठराव्या वर्षी क्लेने बॉक्सिंगमध्ये आपला ठसा उमटवला. १९६०च्या रोम ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकलं. पण फक्त गोऱ्यांसाठी असणाऱ्या रेस्टॉरण्टमध्ये प्रवेश नाकारल्याचा राग म्हणून त्याने ते मेडल नदीत फेकून दिलं. त्यानंतर क्ले व्यावसायिक बॉक्सिंगकडे वळला. एकापाठोपाठ एक फाईट्स जिंकत गेला.   वर्ल्ड चॅम्पियनशिप   फेब्रुवारी १९६४मध्ये सोनी लिस्टनला हरवून क्लेने वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आणि त्याची लोकप्रियताही शिगेला पोहोचली. क्लेने इस्लामचा स्वीकार केला आणि मोहम्मद अली ही त्याची नवी ओळख बनली.   अलीचं नाव फक्त बॉक्सिंगपुरतं मर्यादित नाही. एक खेळाडू आणि एक समाजसेवी म्हणूनही त्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.   तीन वर्ष बॉक्सिंगपासून दूर   व्हिएतनाम युद्धाच्या वेळी अलीने सैन्यात प्रवेश करण्याचे आदेश मिळाल्यावर स्पष्ट नकार दिला. गोऱ्या अमेरिकनांना हा वार जिव्हारी लागला आणि अलीचं वर्ल्ड टायटल हिरावून घेतलं गेलं. तीन वर्ष त्याला बॉक्सिंगपासून दूर रहावं लागलं. कमबॅक केल्यावर त्याने आपलं टायटल परत मिळवलं आणि १९८१ मध्ये निवृत्ती घेईपर्यंत अली अनेक मोठे विजय मिळवत राहिला.   अलीला हरवणारा पहिला बॉक्सर   अलीचे बॉक्सिंगमधले पंच जितके कडक असायचे, तेवढंच त्याचं बोलणं तिखट होतं. अलीच्या कारकीर्दीतील सर्वात एक्सायटिंग काळ म्हणजे जो फ्रेझरबरोबरची त्याची रायव्हलरी. फ्रेझर वर्ल्ड चॅम्पियन अलीला हरवणारा पहिला बॉक्सर ठरला. मात्र अलीने पुढच्या दोन लढती जिंकून फ्रेझरवर वर्चस्व मिळवलं. फ्रेझर गेल्या वर्षीच हे जग सोडून गेला. पण आजही त्याच्या आणि अलीच्या रायव्हलरीची कहाणी सांगितली जाते. द फाईट ऑफ द सेंच्युरी, थ्रिला इन मनिला या दोघांमधल्या गाजलेल्या लढती, शाब्दिक चकमकी दंतकथेचा भाग बनल्या आहेत.   वर्णभेदाविरुद्ध लढाई   बॉक्सिंग रिंगच्या बाहेरही अलीचं वेगळेपण वेळोवेळी उठून दिसलं. साठच्या दशकात वर्णभेदाविरुद्ध लढाईचाही अली आवाज बनला. पुढे इराकच्या कैदेतील अमेरिकन युद्धकैद्यांना सोडण्याचं अपील करण्यासाठी त्याने सद्दाम हुसेनशीही वाटाघाटी केल्या.   बॉक्सिंग रिंगमध्ये प्रतिस्पर्ध्यांना चोपणारा अली, प्रत्यक्षात शांतीचाही दूत बनला. अलीने त्यानंतर स्वतःला समाजकार्यात वाहून घेतलं आहे. पर्किन्सन्स सारखा आजारही त्याला रोखू शकला नाही. वयाची सत्तरी पार केल्यावर अनेक जण विस्मृतीत जातात. पण अली द ग्रेटेस्ट म्हणूनच ओळखला गेला. आजही त्याची ख्याती ग्रेटेस्ट म्हणूनच राहिल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 02 December 2024Girish Mahajan Meet Eknath Shinde : भाजपचे संकटमोचक एकनाथ शिंदेंच्या भेटीला, चर्चांना उधाणEknath Shinde News : एकनाथ शिंदे खरंच नाराज आहेत? मागील वक्तव्य आणि आताची भूमिकेने चर्चांना उधाणABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 02 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
Embed widget