एक्स्प्लोर
हिमखंड तुटल्याने अंटार्क्टिका दुभंगलं!
नवी दिल्ली : एक भलामोठा हिमखंड अंटार्क्टिकापासून तुटला आहे. त्यामुळे अंटार्क्टिका द्वीपकल्पाचा नकाशा बदलून गेला आहे. सुमारे 5 हजार 800 चौरस किलोमीटरचा हिमखंड 10 ते 12 जुलैदरम्यान अंटार्क्टिकापासून तुटला. मुंबईच्या भूभागाच्या नऊपट हा हिमखंड आहे.
'लार्सेन सी' असे या संपूर्ण हिमखंडाचे नाव होते. मात्र, आता तुटून वेगळ्या झालेल्या या हिमखंडाला ‘ए 68’ असॆ नाव देण्याची येण्याची शक्यता आहे. हिमखंड अंटार्क्टिकापासून तुटत असल्याचे नासाच्या ‘अॅक्वा मोडीस’ उपग्रहाने टिपलं होतं.
लार्सेन ए आणि बी याआधीच तुटले!
हिमखंड तुटल्याने तातडीने काही परिणाम जाणवणार नाहीत. मात्र, कालांतराने या समुद्र वाहतुकीवर परिणाम जाणवतील, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. लार्सेन ए आणि लार्सेन बी हिमखंड 1995 आणि 2002 साली तुटले होते.
हिमखंड तुटल्याचा काय परिणाम होईल?
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, समुद्र पातळीत 10 सेमीने वाढ होईल. शिवाय, या द्वीपकल्पापासून वाहतूक करणाऱ्या जहाजांच्या अडथळ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हेनुसार, हिमखंड 10 आणि 12 जुलैच्या दरम्यान तुटून वेगळा झाला.
हिमखंड तुटण्याचं कारण काय?
शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, लार्सेन सी हिमखंड तुटण्यामागे कार्बन उत्सर्जन हे मोठं कारण आहे. कार्बन उत्सर्जनामुळे जागतिक तापमानामध्ये वाढ झाली असल्याने याचा थेट परिणाम वातावरणावर होऊ लागला आहे.
हिमखंड तुटण्याचा भारतावर काय परिणाम?
समुद्र पातळीत वाढ झाल्याने अंदमान आणि निकोबारच्या बंगाल खाडीतील सुंदरबनचा काही भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अरबी समुद्रावर या घटनेचा आता फारसा परिणाम दिसणार नाही. मात्र, भविष्यात याचा परिणाम अरबी सुमद्रावरही जाणवेल. भारताच्या 7 हजार 500 किमी किनारपट्टीवर या हिमखंडाला भविष्यात धोका आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement