एक्स्प्लोर

स्पेशल रिपोर्ट : बांगलादेशचं आयसिस कनेक्शन

ढाका (बांगलादेश) : 1 जुलैच्या ढाकातल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला हादरा बसला आहे. आयसिसनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याचवेळी कट्टरतावादी संघटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे.   त्यामुळं दहशतवादानं घेरलेल्या बांग्लादेश सरकारसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत..देशातील तरुणांचा आयसिसकडे वाढता कल आणि बिघडलेली आर्थिक घडी यामुळं बांग्लादेशात अस्थिरता निर्माण झाली आहे. याच सर्व स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश कुमावत यांनी, थेट बांग्लादेशमधून.   रमजानच्या पवित्र महिन्यात स्फोट 1 जुलै... रमजानचा पवित्र महिना.. आणि याच वेळी बांगलादेशची राजधानी ढाकातल्या पॉश अशा गुलशन भागातल्या होले आर्टीशन बेकरीत स्फोट झाला...6 दहशतवाद्यांनी मिळून तब्बल 20 जणांना ठार केलं. 9 इटालियन नागरिक, 7 जपानी, 2 बांगलादेशी, 2 अमेरिकी आणि एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला.   बांग्लादेशी नागरिक असलेल्यांना आणि जे कुराणाचं पठण करु शकले अशांना दहशतवाद्यांनी सोडून दिलं. पण परदेशी नागरिकांवर मात्र गोळ्या घालून ठार करण्यात आलं.  आयसिसनं या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हल्लखोरांचं आयसिसच्या दहशतवाद्यांशी असलेलं साम्य असलेला पेहरावही सोशल मीडियावर व्हायरल झाला.पण, बांग्लादेश सरकार मात्र हा हल्ला आयसिस नव्हे तर कट्टरतावादी संघटनांनी केल्याचं सांगत आहे.   स्थानिकांचा सहभाग यातलं सत्य काय.? बांग्लादेशात नेमकं काय घडतंय? आयसिस बांग्लादेशात आपले पाय रोवू पाहतंय का...? हे प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे ढाकात हल्ला करणाऱ्या  दहशतवाद्यांमध्ये स्थानिकांचा सहभाग.. सहा पैकी तीन दहशतवादी हे याच भूमीतले आहेत... तेही चांगल्या कुटुंबातले...   निब्रस इस्लाम मित्रांसोबत मस्ती करणारा हा युवक...हा दुसरा-तिसरा कुणी नसून हा आहे, ढाका हल्ल्याचा म्होरक्या निब्रस इस्लाम...सुरुवातीला कॉन्व्हेट आणि पुढे मलेशियातल्या मोहनाश विद्यापीठातून शिक्षण घेणारा निब्रस. त्याचा साथीदार रोहन इम्तियाज तर सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचा मुलगा.. आणि तिसरा सहकारी मीर सालेह मुबाशीर हा देखील स्कूलोस्टीका कॉन्व्हेंटचा विद्यार्थी... हे तीनही युवक चांगलं शिक्षण घेतलेले.. सधन कुटुंबातले होते...   युनिव्हर्सिटी कॅम्पस काय घडतंय... किती बदलतोय बांगलादेश.. हे आहेत ढाकातल्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी.. गुलशन भागात हल्ला करणारे दहशतवादी यांच्यासारखेच विद्यार्थी होते..  ढाकातल्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी परिसराचा फेरफटका मारताना आपल्याला इथे  भारतातल्या युनिव्हर्सिटी कॅम्पसमधील मुक्त वातावरणाचाच अनुभव येतो.   प्रायव्हेट युनिवर्सिटीत जवळपास 20 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यापीठातले विद्यार्थी दहशतवादाकडे का आणि कसे आकर्षित होतात? याचीच सध्या संपूर्ण  बांग्लादेशात चर्चा सुरु आहे.   एक विद्यार्थी तर थेट कॅमेरासमोर आला खरा.... पण बांग्लादेशातल्या आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठ्या हल्ल्याची दहशत इतकी आहे की, कॅमेऱ्यासमोर बोलण्यासही विद्यार्थी घाबरतात.   कट्टरतावाद्यांचा धुमाकूळ ही भीती फक्त विद्यार्थ्यांमध्येच आहे, असे नाही.. तर मागील काही वर्षात सातत्यानं विचारवंत, प्रकाशक, ब्लॉगर आणि धर्मनिरपेक्ष व्यक्तींचे खून होत आहेत.  मागील दीड वर्षात अशाच तब्बल 11 जणांना कट्टरतावाद्यांनी ठार केलं आहे.   हिंदू पंडितांवर हल्ले हे सत्र इथेच थांबत नाही, तर इथे हिंदू पंडितांवर देखील सातत्यानं हल्ले होतायेत.  ढाका हल्ल्यानंतर तर लोकांमध्ये इतकी भीती आहे की,  कॅमेऱ्यासमोर बोलतानाही लोकांचा थरकाप उडतो.   ही भीती केवळ बांग्लादेशी नागरिकांमध्येच आहे असं नाही...16 कोटी लोकसंख्येच्या बांग्लादेशात 90 टक्के मुस्लिम आहे, तर 10 टक्के लोकसंख्या हिंदू.. म्हणजेच हिंदू लोक बांग्लादेशात अल्पसंख्यांक आहेत. या हिंदू मंदिरांच्या पुजाऱ्यांवर सातत्यानं हल्ले होत असताना इथे हिंदू राहतात तरी कसे? हा प्रश्नच आहे...   ढाक्यातील ढाकेश्वरी मंदिराला बांगलादेशातील राष्ट्रीय मंदिर म्हटलं जातं. इथे पर्यटक, भाविकांची रेलचेल असते.  सध्या या मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र याच ढाकेश्वरी देवीमुळेच शहराचा नाव ढाका पडलं.   12 शतकात ढाकेश्वरी मंदिराची निर्मिती 12 व्या शतकात राजा बल्लाळेश्वर यांनी ढाकेश्वरी मंदिराचं निर्माण केलं. बल्लाळेश्वर यांच्या आईला ढाकेश्वरी मातेची मूर्ती सापडली होती, त्यानंतर बल्लाळेश्वर यांनी या मंदिराचं निर्माण केल्याचं सांगितलं जातं. या मंदिरात ढाकेश्वरी देवीसह भगवान शंकराची मूर्ती असून चार शिवलिंगही आहेत. पण, काहींच्या मते मंदिराचं बांधकाम 12 व्या शतकातील निर्माण कलेनुसार नाही. पुजाऱ्यांवरील हल्यामुळं त्यांच्यात भीतीचं वातावरण आहे.   शस्त्रसाठ्यासह पोलीस तैनात ढाकातल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ढाकेश्वरी मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आता इथे शस्त्रसाठ्यासह पोलीस तैनात असतात. तसंच इथे येणाऱ्या प्रत्येकाची चेंकींग केली जातेय.. पण, हल्ल्याची भीती फक्त पुजाऱ्यांमध्येच आहे असं नाही, तर सर्वसामान्य हिंदुंच्या मनातही भीतीचं सावट आहे.   "आमची मंदिरं, पुजाऱ्यांवर ते हल्ले करत आहेत. आमचं सरकार म्हणतं आम्ही सुरक्षीत आहोत. मात्र आम्हाला तसं वाटत नाही. नुकत्याच झालेल्या हल्ल्यामुळे आम्हाला बाहेर पडायलाही भीती वाटते. ढाक्यात जो हल्ला झाला, त्यावेळी अतिरेक्यांनी कुराणमधील आयत विचारल्या होत्या. मात्र आम्ही हिंदू आहोत, आम्हाला ते कसं माहित असेल", असं दीपक या नागरिकाने सांगितलं.   हिंदू कुटुंबं भयभीत दीपक आपले आई-वडील आणि भावंडांसह जुन्या ढाका शहरात राहतो..ज्या भीतीचा त्यानं उल्लेख केला, त्याचा प्रभाव इतका आहे की, हिंदू कुटुंब देखील इथे कॅमेरासमोर यायला घाबरतात..ही बांग्लादेशातील सत्यता आहे. पण, बांग्लादेशात असा खुलेआम संहार कोण आणि का करतंय..?   हल्ल्यांमागे दोन कट्टरतावादी  संघटना या हल्ल्यांमागे दोन कट्टरतावादी  संघटनांची नावं समोर येतायेत..त्या म्हणजे जमायत-उल-मुजाहिदीन आणि अंसार-उल-बांग्ला टीम.. या संघटनाचा हेतू आणि काय आणि यामागे कोण आहेत याबद्दल आपण नंतर बघू... पण त्याआधी, या हल्ल्यानंतर बांग्लादेशात काय बदल होतायेत आणि त्याचे परिणाम काय होत आहेत हे जाणून घेणं महत्वाचं आहे.   पर्यटनावर प्रभाव दहशवादी हल्ल्यामुळे बांगलादेशातील पर्यटनावर परिणाम झाला आहे. वाहीद उल्लाह पर्यटकांच्या सहली आयोजित करतात... त्यांची सिल्वर टुर्स अँड ट्रॅव्हल्स एजंसी आहे. पण सध्याच्या वातावरणामुळे ते चिंतेत सापडले आहेत. ढाकातल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्याकडच्या जपानी पर्यटकांच्या 18 बुकींग रद्द झाले आहेत. एका बुकींगद्वारे जवळपास 15 ते 20 पर्यटक येणार होते. एवढंच नाही तर ब्रिटनच्या 100 पर्यटकांदेखील त्यांच्याकडचं बुकींग रद्द केलंय. या सर्वांमुळे वाहीद यांचं जवळपास 60 लाख रुपयांचं नुकसान झालंय.   सदरघाट जी ठिकाणं पाहण्यासाठी विदेशी पर्यटत ढाक्यात येतात, त्यातलं एक स्थळ म्हणजे हा सदरघाट. दक्षिण ढाकात बुढी गंगा नदीच्या किनारी सदरघाट वसलाय. नदीच्या काठी वसलेल्या जगातल्या मोठ्या बंदरांपैकीच हे एक बंदर.. दररोज दीड लाखाहून अधिक प्रवाशी इथून प्रवास करतात. दररोजच्या जलवाहतुकीसाठी  इथे 300 हून अधिक जहाज आहेत.   जसे लोक विरारवरुन चर्चगेटला किंवा ठाण्यावरुन सीएसटीला ये-जा करतात, त्याप्रमाणे या जलवाहतुकीचा वापर ढाक्यात केला जातो.   ढाक्यात रिक्षांचं प्रमाण अधिक ढाका शहरात रिक्षाचं प्रमाण सर्वाधिक आहे. या शहरात जवळपास पाच लाख रिक्षा आहेत. त्यावरुन किती लोकांची उपजीविका रिक्षांवर अवलंबून आहे, याचा अंदाज तुम्हाला सहज येईल.   ढाका हल्ल्यात प्रामुख्यानं विदेशी पर्यटकांना लक्ष्य केलं गेलं. ज्यामुळं आता पर्यटक ढाका सहली रद्द करतायेत. बांग्लादेशात जवळपास 350 टूर ऑपरेटर्स आहेत. ज्यातल्या अनेकांवर यामुळं आपले व्यवसाय बंद करण्याची वेळ आलीय.   रेडिमेड कपड्यांच्या व्यवसायावरही परिणाम ज्यासाठी बांग्लादेश ओळखला जातो, त्या रेडिमेड कपड्यांच्या व्यवसायावरही या हल्ल्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. बांगलादेशमधून निर्यात होणाऱ्या कपड्यात 80 टक्के निर्यात ही रेडीमेड कपड्यांची असते.. ज्याला निर्यातीला या हल्ल्याचा फटका बसण्याची भीती आहे.   मागील वर्षी बांग्लादेशातून एकून 34 बिलियन डॉलर्सची निर्यात झाली.  ज्यातील 28 बिलीयन डॉलर्सची म्हणजे 80 टक्के निर्यात ही केवळ रेडीमेड कपड्यांची होती.  यावरुन तयार कपड्यांच्या व्यवसायाचा बांग्लादेशाच्या अर्थव्यवस्थेत किती मोठा वाटा आहे, याचा अंदाज आपण सहज लावू शकतो. दहशतवादी हल्ल्याच्या या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.. असं झालं तर हा बांग्लादेशसाठी मोठा धक्का असेल.   बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला धोका कापड व्यवसायातली मंदी ही बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेसाठी दहशतवादी हल्ल्याहून मोठा धोका आहे. बांग्लादेशमधील कापड व्यवसायात अनेक भारतीय व्यापारी आहेत. ते देखील या हल्ल्यानं चिंतेत सापडले आहेत. कुणी काहीच बोलायला तयार नाही. बांग्लादेश भारताचा शेजारीच असल्यानं इथे भारतीय वस्तूंचा प्रभावही मोठा आहे.   बांगलादेशचं  बॉलिवूड प्रेम ढाकात टॅक्सीतून प्रवास करताना तुम्हाला हिंदी गाणीही ऐकायला मिळतील..इथे तुम्हाला भारतीय टीव्ही चॅनेल्स पण दिसतात.. ज्यामुळं बांग्लादेशात हिंदी चित्रपटांचा चाहता वर्ग मोठा आहे. दहशतवादी हल्ला करणाऱ्यांचा म्होरक्या निब्रस हा देखील बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा फॅन आहे. पण याच तरुणानं ढाकात अनेक विदेशी पर्यटकांना ठार करत रक्ताची होळी खेळली.. तीही आयसिसच्या दहशतवाद्यांचं अनुकरण करत..   बांग्लादेशात आयसिसचा वाढता प्रभाव जाणकारांच्या मते आयसिस बांग्लादेशात आपली पायंमुळं रोवतेय. पण, त्याचवेळी हिंदू पंडित, धर्मनिरपेक्ष लोक आणि ब्लॉगर्सचे खून करणाऱ्या जमायत उल मुजाहीदीन आणि अंसार उल बांग्ला टीम या कट्टरतावादी संघटनांचा कारभार नेमका चालतो तरी कसा?   बांगलादेशातील दोन धोके बांगलादेशात सध्या दोन धोके आहेत, एक एबीटी आणि दुसरा जेएमबी....एबीटी हे ब्लॉगर्स आणि सामाजिक कार्यकर्त्यांना टार्गेट करत आहेत, तर जेएमबी हे अल्पसंख्यांकाना निशाणा बनवत आहे.  या दोन्ही संघटनांचे हल्ले आयसिसशी समान आहेत.   *जेएनबी अर्थात जमायत उल मुजाहीदीन, *या कट्टरतावादी संघटनेची सुरुवात 1998 मध्ये अब्दुल रहमाननं केली. *आयसिसप्रमाणे ही संघटनाही बांग्लादेशात शरीयतचा कायदा लागू करु इच्छिते. *चित्रपट गृह, खासगी संस्था, आणि धर्मनिरपेक्ष नागरीक यांच्या निशाण्यावर असतात.. *हिंदू पंडितांच्या हत्येमागे याच संघटनेचा हात असल्याचं बोललं जातं. *बांग्लादेशात अनेक हत्या, आणि बॉम्बस्फोट घडवल्याचा आरोप या संघटनेवर आहे. *संपूर्ण बांग्लादेशात या संघटनेचे जवळपास 10 हजार सदस्य असण्याची शक्यता आहे. *2005 मध्ये या संघटनेच्या 6 मोठ्या नेत्यांना अटक करण्यात आली. *ज्यातल्या चौघांना 2007 मध्ये फाशी देण्यात आली.   विशेष म्हणजे या संघटनेला पाकिस्तानच्या हाय कमिशनकडून फंडींग मिळाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याच आरोपांमुळे पाकिस्तानी राजदूत फरीना अरशद यांना बांग्लादेश सोडावा लागला होता. बांगलादेश सरकारनं या संघटनेवर 2005 मध्ये बंदी घातली आली.   दुसरी संघटना आहे, एबीटी अर्थात अंसार उल बांग्ला टीम *2013 ते 2015 दरम्यान ब्लॉगर्स, लेखक आणि प्रकाशकांच्या हत्या केल्याचे आरोप या संघटनेवर आहेत. *ज्यात अहमद राजीब हैदर, आसीफ मोहिउद्दीन, अविजीत रॉय, अनंता बिजॉय दास, प्रोफेसर एकेएम शफीउल इस्लाम यांच्या हत्यांचा समावेश आहे. *या संघटनेचे अनेक सदस्यांना या हत्याप्रकरणात अटकही झालीय.  *2007 पासून बांग्लादेशात सक्रीय असलेल्या या संघटनेवर दहशतवादी संघटना अल-कायदाचा प्रभाव दिसून येतो. बांग्लादेशातील जमाते इस्लामी पार्टीची विद्यार्थी संघटना इस्लामी छात्र शिबीरवर या संघटनेशी संबंधीत *असल्याचे आरोप करण्यात आलेयेत. *2015 मध्ये या संघटनेवर बांग्लादेश सरकारनं बंदी घातलीय.   वाढता दहशतवाद आणि आयसिसच्या वाढत्या प्रभावाला आता बांग्लादेशात विरोधही सुरु झालाय.   एकंदरीत सद्यस्थितीत बांग्लादेश अस्वस्थ आहे.. आणि बांग्लादेशातील ही अस्थिरतेची स्थिती भारतासाठी देखील एक धोका ठरु शकते.   उमेश कुमावत, एबीपी माझा, ढाका. बांगलादेश
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaPankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटलाCm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget