एक्स्प्लोर
नीरव मोदीला दणका, लंडन कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला
पंजाब नॅशनल बँकेची आर्थिक फसवणूक करुन पळून गेलेला भामटा नीरव मोदी याला लंडन कोर्टाने दणका दिला आहे. लंडनमधील वेस्टमिन्स्टर कोर्टाने मोदीचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
लंडन : पंजाब नॅशनल बँकेची आर्थिक फसवणूक करुन पळून गेलेला भामटा नीरव मोदी याला लंडन कोर्टाने दणका दिला आहे. लंडनमधील वेस्टमिन्स्टर कोर्टाने मोदीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच त्याच्या पोलीस कोठडीत 24 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 24 मे रोजी याप्रकरणी सुनावणी होणार आहे. याआधी 29 मार्च रोजी मोदीची जामीनासाठीची याचिका कोर्टाने फेटाळली होती.
दरम्यान भारताच्या अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोकसी या दोघांच्या जप्त केलेल्या 12 लक्झरी गाड्या विकल्या आहेत. त्या दोघांच्या 13 गाड्यांचा लिलाव करण्यात आला, या लिलावात 13 पैकी 12 गाड्या विकल्या गेल्या आहेत. या विक्रीद्वारे ईडीला 3.29 कोटी रुपये मिळाले आहेत.
VIDEO | नीरव मोदी देश सोडून गेला तेव्हा चौकीदार झोपला होता का? सुप्रिया सुळेंचं भाषण | हॅलो माईक टेस्टिंग | एबीपी माझा पंजाब नॅशनल बँकेची आर्थिक फसवणूक करुन हिरे व्यापारी नीरव मोदी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये भारत सोडून पळून गेला. त्याने पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 13 हजार कोटी रुपयांचा चुना लावला आहे. दोन महिन्यांपूर्वी मोदीला लंडन पोलिसांनी अटक केली असून तो सध्या लंडन पोलिसांच्या ताब्यात आहे.Fugitive Businessman Nirav Modi's bail rejected by London Court, next date of hearing in the case is May 24. (file pic) pic.twitter.com/m3Nv7vQWew
— ANI (@ANI) April 26, 2019
EXCLUSIVE | लंडनमध्ये नीरव मोदी एबीपीच्या कॅमेऱ्यात कैद, कॅमेरा पाहून नीरवचं पलायन | एबीपी माझाAs per PMLA Court’s order 12 vehicles (10 vehicles of Nirav Modi Group and 2 vehicles of Mehul choksi Group) were successfully bidded for ₹ 3.29 Crore (approx.) in e-auction conducted through MSTC.
— ED (@dir_ed) April 26, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement