एक्स्प्लोर
Advertisement
'पतीची हत्या कशी करावी?'च्या लेखिकेला पतीच्या हत्येच्या आरोपात अटक
2 जून रोजी नॅन्सी यांच्या पतीची हत्या झाली होती आणि स्वत: नॅन्सी यांनी फेसबुकवर शोकसंदेशही लिहिला होता.
ओरेगॉन : प्रेमकथा लिहिणाऱ्या अमेरिकेतील एका लेखिकेला पतीची हत्या केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. 68 वर्षीय लेखिका नॅन्सी क्रॅम्पटन ब्रोफी यांच्यावर 63 वर्षीय पती डॅनियल ब्रोफी यांच्या हत्येचा आरोप आहे. महत्त्वाचं म्हणजे नॅन्सी यांनी 'हाऊ टू मर्डर युवर हजबंड' हा निबंधही लिहिला होता.
2 जून रोजी नॅन्सी यांच्या पतीची हत्या झाली होती आणि स्वत: नॅन्सी यांनी फेसबुकवर शोकसंदेशही लिहिला होता. तीन महिन्यांच्या चौकशीनंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. परंतु हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
लेखिका क्रॅम्पटन ब्रोफी यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहे. सेलसाठी अमेझॉन वेबसाईटवर त्या लिस्टेडही करण्यात आलं आहे. नॅन्सी यांनी 2011 मध्ये पतीची हत्या करण्याच्या पद्धतीवर एक निबंधही लिहिला आहे. नॅन्सीने या निबंधात हत्येबाबत आपले विचार मांडले होते.
त्यावेळी त्या म्हणाल्या की, "प्रेम-गूढकथा लिहिणारी लेखिका म्हणून मी हत्या आणि त्यानंतर होणाऱ्या पोलिस प्रक्रियेबाबत अनेक तास विचार केला. इतकंच नाही तर या निबंधात त्यांनी हत्येच्या तुलनेत घटस्फोट खर्चिक असतं."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
क्रिकेट
राजकारण
Advertisement