China visa norms for Indians : या दोस्तांनो! डोनाल्ड ट्रम्प यांनी नाकेबंदी करताच चीनकडून भारतीयांसाठी पायघड्या; दोस्तीचा पैगाम देत चीनमध्ये येणाऱ्यांना बंपर ऑफर
China visa norms for Indians : चिनी व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या भारतीयांना आता सक्तीने ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्याची आवश्यकता राहणार नाही. यामुळे व्हिसा अर्ज प्रक्रिया जलद आणि सोपी होईल.

China visa norms for Indians : अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापार युद्धादरम्यान, चीन भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ९ एप्रिलपर्यंत भारतातील चिनी दूतावास आणि वाणिज्य दूतावासांनी 85 हजारहून अधिक भारतीय नागरिकांना व्हिसा जारी केले आहेत. भारतातील चीनचे राजदूत शु फेईहोंग यांनी अधिकाधिक भारतीयांना चीनमध्ये येऊन देशाला भेट देण्याचे आवाहन केले. त्यांनी X वर लिहिले की, 9 एप्रिल 2025 पर्यंत, भारतातील चिनी दूतावास आणि वाणिज्य दूतावासांनी चीनला भेट देणाऱ्या भारतीय नागरिकांना 85 हजारहून अधिक व्हिसा जारी केले आहेत. सुरक्षित आणि मैत्रीपूर्ण चीन जाणून घेण्यासाठी अधिकाधिक भारतीय मित्रांचे चीनला भेट देण्याचे स्वागत आहे.
भारतीय पर्यटकांसाठी अनेक सवलती, ऑनलाईन अपॉइंटमेंटची आवश्यकता नाही
बायोमेट्रिक सूट
कमी कालावधीसाठी चीनला प्रवास करू इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांना आता त्यांचा बायोमेट्रिक डेटा सादर करण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे व्हिसा प्रक्रियेचा वेळ कमी होईल.
जलद आणि सोपी प्रक्रिया
व्हिसा मंजुरी प्रणालीला गती देण्यासाठी, चीनने मंजुरीच्या वेळापत्रकातही शिथिलता आणली आहे, ज्यामुळे प्रक्रिया वेगवान झाली आहे.
व्हिसा शुल्कात कपात
चीनने अधिकाधिक भारतीय पर्यटकांना आपल्या देशात आकर्षित करण्यासाठी व्हिसा शुल्कातही कपात केली आहे.
पर्यटनाला प्रोत्साहन
भारतातील चिनी दूतावास अधिकाधिक भारतीय प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी चिनी पर्यटनाला प्रोत्साहन देत आहे.
मार्चपर्यंत 50 हजार व्हिसा जारी करण्यात आले
मार्चच्या सुरुवातीला, चीनच्या राजदूतांनी सांगितले होते की त्यांच्या देशाने भारतीयांना 50 हजारहून अधिक व्हिसा जारी केले आहेत. फेईहोंग म्हणाले की, जेव्हा वसंत ऋतूमध्ये फुले उमलतात, तेव्हा आम्ही अधिकाधिक भारतीय मित्रांना चीनमध्ये येऊन वसंत ऋतूमध्ये आपल्या देशाचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित करतो. अलिकडच्या काही महिन्यांत, चीनने भारतीय नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया नियमांमध्ये अनेक शिथिलता आणल्या आहेत. नवीन चिनी व्हिसा नियमांमध्ये अनिवार्य ऑनलाइन अपॉइंटमेंट रद्द करणे आणि व्हिसा शुल्कात कपात करणे समाविष्ट आहे. दोन्ही देशांमधील प्रवास सुलभ करण्यासाठी ही पावले उचलली जात आहेत. 2024 मध्ये किती भारतीय पर्यटकांनी चीनला भेट दिली याची आकडेवारी सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाही. गेल्या वर्षी, भारतातील चिनी दूतावासाचे प्रवक्ते वांग शिओजियान यांनी सांगितले होते की 2023 मध्ये भारतीय नागरिकांना 1 लाख 80 हजारहून अधिक चिनी व्हिसा जारी करण्यात आले.
गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले
15 जून 2020 रोजी चीनने पूर्व लडाखच्या सीमावर्ती भागात सरावाच्या बहाण्याने सैन्य जमवले होते. यानंतर अनेक ठिकाणी घुसखोरीच्या घटना घडल्या. भारत सरकारनेही या भागात चीनइतकेच सैन्य तैनात केले होते. परिस्थिती इतकी बिकट झाली की प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) गोळीबार झाला. दरम्यान, 15 जून रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत 20 भारतीय सैनिक शहीद झाले. नंतर भारतानेही याला चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये 40 चिनी सैनिक मारले गेले. यानंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये बराच तणाव निर्माण झाला. तथापि, रशियातील कझान येथे झालेल्या जी-20 शिखर परिषदेदरम्यान मोदी आणि जिनपिंग यांच्यातील भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























