एक्स्प्लोर

Electric Vehicle : वाढत्या प्रदुषणामुळे अमेरिकेचा इलेक्ट्रिक वाहनांवर भर, चार्जिंग सुविधांसाठी योजनांचे अनावरण

Electric Vehicle : वाढत्या प्रदुषणामुळे अमेरिकेने इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. बायडेन प्रशासनाने इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या चार्जिंग सुविधांसाठी योजनांचे अनावरण केले आहे.

Electric Vehicle Charging Action Plan : अमेरिकेने (America) वाढत्या प्रदुषणावर उपाय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांवर (Electric Vehicle) भर देण्यास सुरुवात केली आहे. जो बायडेन (Joe Biden) प्रशासनाने सोमवारी यासंदर्भात एक सरकारी व्यापक योजना जारी केली आहे. यामध्ये इलेक्ट्रिक कार आणि ट्रकचा व्यापर आणि अवलंब करण्यासाठी महत्त्वाच्या इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन तयार करण्याच्या कामाला गती देण्यात येईल. या योजनेचा प्रमुख आधारस्तंभ म्हणजे हवामान बदलास कारणीभूत असणार्‍या हरितगृह वायू उत्सर्जनाचा सामना करणे असेल.

व्हाईट हाऊसने (White House) सोमवारी रोजी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग (Electric Vehicle Charging) पायाभूत सुविधांमध्ये प्रवेश वाढवण्याच्या योजनेचे अनावरण केले. या योजना राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे 2030 पर्यंत नवीन वाहनांच्या विक्रीत निम्म्या इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढवणे. मेरीलँडमधील एका कार्यक्रमात उपाध्यक्ष कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी बिडेन प्रशासनाच्या इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग अ‍ॅक्शन प्लॅनची (Electric Vehicle Charging Action Plan) ​​घोषणा केली. या योजनेमुळे गुंतवणूक वाढवण्यासाठी, पायाभूत सुविधांवर शुल्क आकारण्यासाठी एकसमान दृष्टीकोन स्थापन करण्यात मदत होईल आणि इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यात ग्राहकांची आवड निर्माण होईल, असे व्हाईट हाऊसने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
कमला हॅरीस म्हणाल्या की, ''देशात आणि जगभरातील इलेक्ट्रिक वाहन वाहतुकीचे भविष्य आहे. ऑटो उद्योग स्पष्टपणे इलेक्ट्रिक वाहनांकडे जात आहे. त्यामुळे त्यासंबंधित उपाययोजनांवर भर देणे गरजेचे आहे. ऊर्जा विभाग आणि परिवहन विभाग इलेक्ट्रिक वाहन पायाभूत सुविधा तैनात करण्यासाठी ऊर्जा आणि परिवहन विभागाचे संयुक्त कार्यालय तयार करेल. हे कार्यालय सुरुवातीला सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स बांधण्यावर लक्ष केंद्रित करेल. यामुळे आसपासच्या भागातील इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्या नागरिकांना सुविधा उपलब्ध होतील. 14 डिसेंबर रोजी कार्यालयाचा औपचारिक शुभारंभ होईल.''

कमला हॅरीस यांनी पुढे सांगितले की, ''मार्चअखेर सदस्यांची नियुक्ती करून इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करणारी सल्लागार समिती तयार करण्याचाही दोन्ही विभागांचा मानस आहे. याव्यतिरिक्त प्रशासनाकडून इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन अमेरिकेमध्ये आणण्याच्या प्रयत्नात उत्पादकांसोबत चर्चाही सुरु आहेत.''

इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget