एक्स्प्लोर

आनंदवार्ता! मुंबईत रात्रीच्या वेळी होणार कोरोना लसीकरण

Coronavirus vaccination Mumbai : मुंबईकरांना आता रात्री 11 वाजेपर्यंत लस मिळणार आहे. मुंबई महापालिकेने सध्या प्रायोगिक तत्वावर रात्री 11 वाजेपर्यंत लसीकरण केंद्र सुरू केले आहे.

Night Vaccination Center Mumbai :  कोरोना महासाथीला अटकाव करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी मुंबई महापालिकेने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबईमध्ये सोमवारपासून संध्याकाळी पाच ते रात्री 11 वाजेपर्यंत लसीकरण केंद्र सुरू राहणार आहेत. रात्रीची लसीकरण केंद्रे ही रेल्वे स्थानक परिसरात असणार आहे. त्यामुळे कष्टकरी, सामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. सध्या ही लसीकरण केंद्रे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहेत. 

मुंबईसह राज्यात लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने मुंबईत रात्रीच्या वेळीचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील प्रत्येक प्रभागात सध्या अशी किमान दोन लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. 

या रात्रीच्या लसीकरण केंद्राचा फायदा मुंबईमधील नोकरदार, कष्टकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर होणार आहे. कामावरून घरी परताना लस घेणे त्यांना शक्य होणार आहे. अनेकजण नोकरी, रोजगारासाठी सकाळी घराबाहेर पडल्यानंतर रात्रीच्या वेळी घरी परतात. त्यामुळे अनेकांना लस घेणे शक्य होत नाही. त्याशिवाय, अनेकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र, दुसरा डोस घेण्याची वेळ आली तरी त्यांना वेळेअभावी, आवश्यकेतेनुसार लस घेण्याची वेळ मिळाली नाही. अशांना या रात्रीच्या लसीकरण केंद्राचा मोठा फायदा होणार आहे. 

याआधी लसीकरण केंद्रे ही सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होती. त्यामुळे अनेकांना लस घेता येत नव्हती. आता रात्री 11 पर्यंत लसीकरण होणार असल्यामुळे लसीकरणाचा वेग वाढेल असा विश्वास महापालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेत अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांसाठी 'गुडन्यूज'; सरकारचा मोठा निर्णय, 'निपुण सेतू' उपक्रम
MPSC परीक्षेत अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांसाठी 'गुडन्यूज'; सरकारचा मोठा निर्णय, 'निपुण सेतू' उपक्रम
Ashok Kharat and Anjali Damania: अशोक खरातला रुपाली चाकणकरांपेक्षाही जास्त फोनकॉल करणारा 'तो' सरकारी अधिकारी कोण; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
अशोक खरातला रुपाली चाकणकरांपेक्षाही जास्त फोनकॉल करणारा 'तो' सरकारी अधिकारी कोण; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
Ajit Pawar : अजित पवारांच्या घराबाहेरील ब्लॅक मॅजिकशी अशोक खरातचं कनेक्शन, ठाण्यातील हॉटेलमधून 34 सेकंदात पैशांचे 6 मोठे व्यवहार, अंजली दमानियांचा आरोप
अजित पवारांच्या घराबाहेरील ब्लॅक मॅजिकशी अशोक खरातचं कनेक्शन, ठाण्यातील हॉटेलमधून 34 सेकंदात पैशांचे 6 मोठे व्यवहार, अंजली दमानियांचा आरोप
Taxi And Rickshaw Licenses: मराठी लिहिता वाचता न येणाऱ्या रिक्षा अन् टॅक्सी चालकांचे लायसन्स होणार रद्द; राज्य सरकारच्या निर्णयाला रिक्षा, टॅक्सी चालक-मालक संघटनांचा विरोध
मराठी लिहिता वाचता न येणाऱ्या रिक्षा अन् टॅक्सी चालकांचे लायसन्स होणार रद्द; राज्य सरकारच्या निर्णयाला रिक्षा, टॅक्सी चालक-मालक संघटनांचा तीव्र विरोध

व्हिडीओ

Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : अजित पवारांच्या घराबाहेरील ब्लॅक मॅजिकशी अशोक खरातचं कनेक्शन, ठाण्यातील हॉटेलमधून 34 सेकंदात पैशांचे 6 मोठे व्यवहार, अंजली दमानियांचा आरोप
अजित पवारांच्या घराबाहेरील ब्लॅक मॅजिकशी अशोक खरातचं कनेक्शन, ठाण्यातील हॉटेलमधून 34 सेकंदात पैशांचे 6 मोठे व्यवहार, अंजली दमानियांचा आरोप
Bhushan Pradhan Marriage: मराठीतल्या चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्याच्या लग्नाची जोरदार चर्चा, अखेर मौन सोडलं; 'स्वप्नसुंदरी'चं नाव सांगूनच टाकलं
मराठी अभिनेत्याच्या लग्नाची जोरदार चर्चा, अखेर मौन सोडलं; 'स्वप्नसुंदरी'चं नाव सांगूनच टाकलं
वैद्यकीय तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी डॉक्टरांमधील करुणा अन् प्रामाणिकपणा महत्त्वाचा; राष्ट्रपती मुर्मूंचा सल्ला
वैद्यकीय तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी डॉक्टरांमधील करुणा अन् प्रामाणिकपणा महत्त्वाचा; राष्ट्रपती मुर्मूंचा सल्ला
संतापजनक... पिंपरी-चिंचवडमध्ये आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; नराधमाला अटक
संतापजनक... पिंपरी-चिंचवडमध्ये आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; नराधमाला अटक
MPSC परीक्षेत अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांसाठी 'गुडन्यूज'; सरकारचा मोठा निर्णय, 'निपुण सेतू' उपक्रम
MPSC परीक्षेत अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांसाठी 'गुडन्यूज'; सरकारचा मोठा निर्णय, 'निपुण सेतू' उपक्रम
Taxi And Rickshaw Licenses: मराठी लिहिता वाचता न येणाऱ्या रिक्षा अन् टॅक्सी चालकांचे लायसन्स होणार रद्द; राज्य सरकारच्या निर्णयाला रिक्षा, टॅक्सी चालक-मालक संघटनांचा विरोध
मराठी लिहिता वाचता न येणाऱ्या रिक्षा अन् टॅक्सी चालकांचे लायसन्स होणार रद्द; राज्य सरकारच्या निर्णयाला रिक्षा, टॅक्सी चालक-मालक संघटनांचा तीव्र विरोध
Supriya Sule son in Law: सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या जावयाच्या कंपनीसोबत राज्य सरकारचा आणखी एक करार, साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक
सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या जावयाच्या कंपनीसोबत राज्य सरकारचा आणखी एक करार, साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक
Jalgaon Crime News : 600 बनावट शिक्षकांची भरती अन् कोट्यवधींचा पगार लाटला; शालार्थ घोटाळ्यात 48 अधिकाऱ्यांना एसआयटीची नोटीस
600 बनावट शिक्षकांची भरती अन् कोट्यवधींचा पगार लाटला; शालार्थ घोटाळ्यात 48 अधिकाऱ्यांना एसआयटीची नोटीस
Embed widget