NASA : जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने घेतले Merging Galaxies चे छायाचित्र, सूर्यापेक्षा 100 अब्ज पट अधिक तेजस्वी, एकदा पाहाच
NASA : आकाशगंगा सुमारे 500 प्रकाश-वर्षे दूर आहे. या आकाशगंगेच्या विलीनीकरणानंतर दोन्हीच्या आकारात बदल झाला आहे.
NASA : जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने Merging Galaxies म्हणजेच एकमेकांत विलीन होणाऱ्या आकाशगंगांच्या जोडीचे छायाचित्र घेतले आहे, ज्याला II ZW 96 असेही म्हणतात. डेल्फिनस नक्षत्रात विलीन होणारी आकाशगंगा सुमारे 500 प्रकाश-वर्षे दूर आहे. या आकाशगंगेच्या विलीनीकरणानंतर दोन्हीच्या आकारात बदल झाला आहे. विलीनीकरणानंतर दोन्ही आकाशगंगा गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली वळल्या आहेत.
View this post on Instagram
सूर्यापेक्षा सुमारे 100 अब्ज पट तेजस्वी
हे छायाचित्र जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने त्याच्या सभोवतालच्या आकाशगंगांच्या उत्क्रांतीची तपासणी करण्यासाठी टिपले होते, ज्याचा अभ्यास वेबच्या संवेदनशील उपकरणांद्वारे करण्यात आला आहे. या इन्फ्रारेड फ्रिक्वेन्सीमधील आकाशगंगा सूर्यापेक्षा 100 अब्ज पट अधिक तेजस्वी आहेत.
A pair of views of a pair of (merging) galaxies? Yes, please!
— Hubble (@NASAHubble) November 30, 2022
Hubble and @NASAWebb have both observed the galactic pair II ZW 96 in different wavelengths of light.
You can learn more about these views here: https://t.co/kFTnW8kTLG pic.twitter.com/Wcfq0pAib7
अनेक रंगात दिसणारी आकाशगंगा
नासाच्या मते, आकाशगंगा अनेक रंगांमध्ये दिसतात. या प्रकारची जोडी विविध तरंगलांबीमध्ये विशेष तेजस्वी असते, जी तारा तयार होण्याच्या प्रक्रियेमुळे होते. नासाने सांगितले की या आकाशगंगांची चमक सूर्यापेक्षा 100 अब्ज पट जास्त आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, या जोडीला खगोलशास्त्रज्ञांच्या टीमने केवळ एक चाचणी म्हणून निवडले होते. II ZW 96 चा अभ्यास या आधी हबल स्पेस टेलिस्कोप आणि इतर वेधशाळांचा वापर करून निरीक्षण करण्यात आले आहे, शास्त्रज्ञांना विश्वास आहे की, वेब स्पेस टेलिस्कोपच्या माध्यमातून गॅलेक्टिक वातावरणाबद्दल अधिक माहिती देईल.