एक्स्प्लोर

हाफिज सईदला तातडीने अटक करा, अमेरिकेने पाकला खडसावलं

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील न्यायालयीन समीक्षा बोर्डाने हाफिजची नजरकैदेतून मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

वॉशिंग्टन : जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला तातडीने अटक करा, अशा शब्दात अमेरिकेने पाकिस्तानला खडसावलं आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील न्यायालयीन समीक्षा बोर्डाने हाफिजची नजरकैदेतून मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना शेकडो अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरली असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हिथर नॉरेट यांनी म्हटलं आहे. 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदची नजरकैदेतून गुरूवारी रात्री सुटका झाली आहे. सुटकेनंतर लाहोरमध्ये केक कापून हाफिजने सेलिब्रेशन केलं. यावेळी हाफिजचं अभिनंदन करण्यासाठी जमात-उद-दावाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 26/11 च्या नऊ वर्षपूर्तीनिमित्त हाफिज सईद PoK ला जाणार नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर हाफिज सईद आता 26/11 च्या नऊ वर्षपूर्तीनिमित्त पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तान लष्कर आणि आयएसआयच्या सूचनेनुसार हाफिज सईद हा दौरा करणार असल्याचीही माहिती आहे. दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प आणि लाँचिंग पॅडचा दौरा हाफिज सईद पीओकेमध्ये लाईन ऑफ कंट्रोल म्हणजे एलओसी जवळ तयार करण्यात आलेल्या दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प आणि लाँचिंग पॅडचा दौरा करणार आहे. मुंबई 26/11 हल्ल्याला नऊ वर्ष पूर्ण होण्याअगोदर हाफिज सईदची सुटका करण्यात आली आहे. या हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता. हाफिज सईद कोण आहे? हाफिज सईद जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाची स्थापनाही त्यानेच केली आहे. 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्याचा कट रचणाऱ्यांमध्ये त्याचा समावेश होता. 11 जुलै 2006 रोजी मुंबईत ट्रेनमध्ये झालेल्या हल्ल्यातही त्याचा होत होता. शिवाय तो मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. हाफिज सईद भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे. एप्रिल 2012 मध्ये, अमेरिकेने दहशतवादासाठी जबाबदार असलेल्यांची यादी जारी केली. या यादीत हाफिज सईदचं नाव दुसऱ्या क्रमांकावर होतं. अमेरिकेने हाफिज सईदला पकडून देण्यासाठी एक कोटी डॉलरचं बक्षीसही जाहीर केलं आहे. तर भारताने त्याच्या विरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. संयुक्त राष्ट्र संघानेही जमात-उद-दावाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Big Fight Vidarabh Vidhansabha : नंदुरबार, नवापूर, सिंदखेडा विदर्भाच्या बिग फाईटShrikant Shinde Rally | प्रचाराचा शेवटचा दिवस, महायुतीसाठी श्रीकांत शिंदेंचा रोडशोSanjay Shirsat on Kalicharan : कालीचरण यांच्या सभेचा आणि माझा काहीही संबंध नाहीSaroj Patil speech Kagal : Hasan Mushrif नक्की गाडला जाणार, शरद पवारांच्या बहिणीचा हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Embed widget