एक्स्प्लोर
अल कायदाचा दक्षिण आशिया प्रमुख आसिम उमरचा खात्मा, भारताला मोठा दिलासा
उमर हा भारतात दहशतवादी कारवाया वाढविण्यासाठी प्रयत्नशील होता. त्याचं टार्गेट हे भारत असल्याने त्याचा खात्मा करणं हे भारतासमोर आव्हान होतं. आता तो ठार झाल्याने भारतीय सुरक्षा दलाला मोठा दिलासा आहे.
नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये केलेल्या दहशतवाद विरोधी कारवाईमध्ये भारताच्या एका मोठ्या दुश्मनाचा खात्मा झाला आहे. अल कायदा या अतिरेकी संघटनेचा दक्षिण आशिया भागातील म्होरक्या आसिम उमर ठार झाला आहे. अफगाणिस्तानच्या गुप्तचर विभागाने ही माहिती दिली आहे. गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार तालिबानमध्ये मागील महिन्यात अमेरिका आणि अफगाणिस्तानच्या संयुक्त कारवाईत त्याचा मृत्यू झाला आहे.
आसिम उमर हा पाकिस्तानी नागरिक होता. उमरसोबतच अन्य सहा दहशतवाद्यांनाही ठार करण्यात यश मिळालं आहे. उमर हा भारतात दहशतवादी कारवाया वाढविण्यासाठी प्रयत्नशील होता. त्याचं टार्गेट हे भारत असल्याने त्याचा खात्मा करणं हे भारतासमोर आव्हान होतं. आता तो ठार झाल्याने भारतीय सुरक्षा दलाला मोठा दिलासा आहे.
अफगाणिस्तान आणि अमेरिकेने गेल्या महिन्यात एक संयुक्त मोहिम राबवली होती. त्यात उमर ठार झाला होता. मात्र ही माहिती बाहेर आली नव्हती. मात्र आता उमर ठार झाल्याच्या माहितीला दुजोरा देण्यात आला. 2014 मध्ये त्याला भारतीय उपखंडाचा अल कायदाचा प्रमुख करण्यात आलं होतं. त्यामुळे त्याच्यापासून भारताला मोठा धोका होता.
अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा संचनालयाने (एनडीएस) ट्वीट करून सांगितले आहे की, 'एनडीएसच्या माध्यमातून 23 सप्टेंबर रोजी हेलमंड प्रांतात मूसा कला जिल्ह्यामध्ये एका संयुक्त मोहिमेत एक्यूआयएसचा नेता आसिम उमर याचा मृत्यू झाला आहे. तो भारतीय उपमहाद्वीप मध्ये अल कायदाचा नेता होता'.
उमरसोबत जे दहशतवादी ठार झाले होते तेही सर्व पाकिस्तानी होते अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. सुरक्षा दलाच्या विशेष पथकाने मूसा काला जिल्ह्यातल्या तालिबानच्या एका कॅम्पवर हा हल्ला केला होता. त्या कारवाईत हे दहशतवादी ठार झालेत. उमरला तालिबानच्याच एका परिसरात दफन करण्यात आलं होतं, अशीही माहिती आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement