एअरहोस्टेसने पुस्तक लिहून उघड केले अब्जाधीशांचे विमानातले चाळे! खळबळजनक माहिती समोर
एका एअर होस्टेसने आपल्या 'सीक्रेट ऑफ ए प्रायव्हेट फ्लाइट अटेंडंट' या पुस्तकात विमान प्रवासातील आलिशान जगाचे काळं सत्य सांगितले आहे.
![एअरहोस्टेसने पुस्तक लिहून उघड केले अब्जाधीशांचे विमानातले चाळे! खळबळजनक माहिती समोर Air hostess to billionaires shares sordid secrets from on-board private jets एअरहोस्टेसने पुस्तक लिहून उघड केले अब्जाधीशांचे विमानातले चाळे! खळबळजनक माहिती समोर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/03/24ab522ab4b9583525d6cacd2bc78242_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोट्यावधी रुपये खर्च करून जगातील अब्जाधीश बहुधा खासगी विमानाने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. अशा खाजगी विमानात जवळजवळ सर्व सुखसुविधा उपलब्ध असतात. यासह पाहुण्यांच्या देखरेखीसाठी एअरहोस्टेस दिमतीला ठेवल्या जातात. पण एका माजी एअरहोस्टेसने तिच्या एका पुस्तकात स्वप्नांच्या या आलिशान जगाचे काळं सत्य सांगितले आहे. सास्किया स्वान नावाच्या या एअर होस्टेसने सांगितले आहे की तिला खाजगी विमानात शारीरिक संबंधांपर्यंत भाग पाडले जात होते.
विलासी जगाचा काळा बुरखा
सास्कीयाने आपल्या 'सीक्रेट ऑफ ए प्रायव्हेट फ्लाइट अटेंडंट' या पुस्तकात लिहिले आहे की हा जॉब मिळवण्यासाठी तिला आठ गुप्त करारांवर स्वाक्षरी करावी लागली होती. एक्केचाळीस लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजवर तिला एका अब्जाधीशाची नोकरी मिळाल्याचे तिने सांगितले. पंचतारांकित हॉटेलमध्ये तिची राहण्याची सोय होती. तिला वाटलं की तिचे संपूर्ण आयुष्य बदलले आहे.
मात्र, या नोकरीची आणखी एक बाजू होती ज्याचा तिने उल्लेख केला. तिने सांगितले की जेव्हा अब्जाधीश तिच्या पत्नीला लॉस एंजेलिसमध्ये घेऊन गेला तेव्हा तीसुद्धा त्याच्याबरोबर होती. त्याने आपल्या बायकोला सोडल्यानंतर सास्कियाला सांगितले की तात्काळ त्याच्या पत्नीचे सर्व पुरावे मिटवून टाक, ज्यात तिचा कंगवा, पिशवी, शूज इ. वस्तू होत्या. जर त्याच्या मैत्रिणीस दुसरी गर्लफ्रेंड असल्याची माहिती मिळाली तर तुझी नोकरी जाईल, अशी धमकी त्या अब्जाधीशाने सास्कीयाला दिली होती.
तडजोड करावी लागली
सास्कीयाने आपल्या पुस्तकात लिहलंय की तिला नंतर कळले की अब्जाधीश तिच्याकडून फ्लाइट अटेंडंटपेक्षा वेगळी अपेक्षा करत होता. न्यूयॉर्कच्या प्रवासादरम्यान अब्जाधीशांसोबत शारीरिक संबंध न ठेवल्यास तिला नोकरीवरून काढून टाकले जाईल अशी धमकी दिल्याचे तिने सांगितले. पण, त्यावेळी ती कर्जात बुडाली होती. अशा परिस्थिती तिला अश्रू अनावर झाले आणि तिने रात्रीच्या जेवणाचे आमंत्रण स्वीकारले.
यासह, सास्कियाने आपल्या पुस्तकात सौदी राजकुमारबरोबर विमानात घालवलेल्या गोष्टींचा उल्लेखही केला. तिने सांगितले की जेद्दामध्ये फ्लाइट अटेंडेंटला राजवाड्याच्या आत ठेवण्यात येत होते आणि राजघराण्यातील व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पैसे देण्यात येत होते. यावेळी दरमहा त्या मुलींची एड्सची तपासणी केली जात असे. सास्कीयाने पुढे सांगितले, की अब्जाधीश जर्मनबरोबर काम करत असताना तिला पाळीव पोपटाची काळजी घ्यावी लागली होती. कारण, त्याला पोपट आवडत होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)