एक्स्प्लोर
भारतात हार्ट सर्जरी झालेल्या पाकिस्तानी बाळाचा मायदेशी मृत्यू
भारत-पाकिस्तानमधील ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर कंवल यांना मेडिकल व्हिसा मिळवण्यात अडथळे येत होते. अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या मदतीने कंवल यांना व्हिसा मिळाला
लाहोर : गेल्या महिन्यात मेडिकल व्हिसा काढून हार्ट सर्जरीसाठी भारतात आलेल्या पाकिस्तानी बाळाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सोमवारी लाहोरमधील घरी परतल्यानंतर डिहायड्रेशनमुळे चिमुरड्या रोहनची प्राणज्योत मालवली.
चार महिन्यांच्या रोहन सादिकच्या मृत्यूची बातमी त्याचे वडील कंवल सादिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. रोहनच्या हृदयात भोक असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी त्याला पाकिस्तानहून भारतात आणायचं होतं.
भारत-पाकिस्तानमधील ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर कंवल यांना मेडिकल व्हिसा मिळवण्यात अडथळे येत होते. अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या मदतीने कंवल यांना व्हिसा मिळाला.
12 जुलै रोजी रोहनला भारतात आणण्यात आलं. त्याच्यावर नोएडातील जेपी हॉस्पिटलमधील डॉ. राजेश शर्मा आणि यांच्या टीम 14 तारखेला शस्त्रक्रिया केली. सर्जरीनंतर रोहनच्या कुटुंबीयांनी भारत सरकार आणि स्वराज यांचे आभारही मानले होते.
रविवारी 6 ऑगस्टच्या रात्री डिहायड्रेशनमुळे लाहोरमधील राहत्या घरी रोहनचा मृत्यू झाला. रोहनच्या मृत्यूनंतर ट्वीट करताना त्याच्या वडिलांनी भारतीयांचे आभार व्यक्त केले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement