Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंप, 6.3 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के
Afghanistan Earthquake Update : अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंप झाला आहे. हेरात शहरापासून 33 किलोमीटर 20 मैल अंतरावर मध्यरात्री 3.36 वाजता वाजता भूकंप झाला.

Afghanistan Earthquake Update : अफगाणिस्तानमध्ये पुन्हा जमीन हादरली आहे. हेरात शहरात मध्यरात्री भूकंप झाल्याची माहिती समोर येत आहे. मध्यरात्री 3.36 वाजता वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. हेरातपासून 33 किलोमीटर 20 मैल अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. रविवारी पश्चिम अफगाणिस्तानात 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला अशी माहिती यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिली आहे. अफगाणिस्तानमधील भूकंपाचं सत्र सुरुच असून यामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंप
USGS ने ट्विटर एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की, हेरात शहरापासून 33 किलोमीटर अंतरावर स्थानिक वेळेनुसार 3.36 मिनिटांनी भूकंप झाला. त्यानंतर आणखी एका ट्वीटमध्ये सांगितलं की, अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात 5.5 तीव्रतेचा आफ्टरशॉक बसला, अशी माहिती यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने दिली आहे.
BREAKING: A powerful 6.3 magnitude earthquake has struck western Afghanistan, the US Geological Survey said, more than a week after strong quakes and aftershocks killed thousands of people and flattened entire villages. https://t.co/6mstNBATXY
— The Associated Press (@AP) October 15, 2023
अनेक गावं उदध्वस्त, 1000 हून अधिक मृत्यू
7 ऑक्टोबरला हेरातच्या याच भागात 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला आणि आठ शक्तिशाली आफ्टरशॉक्सही बसले. यामुळे घरे कोसळली असून अनेक गावं उद्ध्वस्त झाली आहेत. भूकंपामुळे 1,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून आणि शेकडो लोक जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखालून बचावलेले हजारो घाबरलेले रहिवासी आश्रय निवाऱ्यात आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Notable quake, preliminary info: M 6.3 - western Afghanistan https://t.co/v6tjRGPe7s
— USGS Earthquakes (@USGS_Quakes) October 15, 2023
हेही वाचा : अफगाणिस्तानमधील भूकंपाची भविष्यवाणी खरी ठरली! आता भारताला विनाशकारी भूकंपाची भीती
अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचं सत्र सुरुच
अफगाणिस्तानध्ये ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. एक भूकंपातून सावरतो न सावरतो तोच पुन्हा जमीन हादरल्याच्या घटना समोर येत आहे. 11 ऑक्टोबरलाही पहाटे अफगाणिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात भूकंपाचे हादरे जाणवले होते. अमेकिन भूगर्भ संशोधन संस्था USGS च्या माहितीनुसार, हैरात प्रांताच्या आसपासच्या परिसरात हा भूकंप झाला. त्याआधी 7 ऑक्टोबरलाही विनाशकारी भूकंपाचे धक्के बसले होते.
महत्वाच्या इतर बातम्या :
Afghanistan Earthquake : जाको राखे साईंया मार सके न कोय... 36 तासांनी ढिगाऱ्याखालून चिमुकली सुखरूप बचावली; पाहा VIDEO
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
