Afghanistan: अफगाणिस्तानातील परिस्थिती बिकट, खायला अन्न नाही, उपाशी मुलांना झोपवण्यासाठी झोपेचं औषध देण्यात येतंय
Afghanistan News : मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तानची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की कुटुंबातील सदस्यांना आपल्या मुलांना खायला घालायलाही अन्नही नाही.
Afghanistan : अफगणिस्तान देशात आर्थिक, सामाजिक आणि मानवी हक्कांचे संकट एखाद्या राक्षसाप्रमाणे वाढत आहे. एका ठिकाणी गरिबी आणि उपासमार वाढत आहे, तर दुसरीकडे महिलांवर कडक निर्बंध लादले जात आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तानची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की कुटुंबातील सदस्यांना आपल्या मुलांना खायला घालायलाही अन्नही नाही. उपाशी मुलांनी जेवण मागू नये म्हणून त्यांना झोपेच्या गोळ्या देऊन झोपवले जात आहे.
पालक आपल्या मुलींची किडनी विकत आहेत.
अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यापासून तेथील लोकांचे जगणे कठीण झाले आहे. गरिबी आणि बेरोजगारीची परिस्थिती अशी आहे की, कुटुंबातील सदस्य मुलांना भूक लागल्यावर झोपेची औषधे देत आहेत. भुकेल्या कुटुंबांच्या पोटापाण्यासाठी पालक आपल्या मुलींची किडनी विकत आहेत. तर एक आई देवाला चक्क प्रार्थना करत आहे की, तिचे मूल शांतपणे झोपावे, पण अन्न मागू नये. कारण या देशात खायला अन्नही नाही. मुलाला गाढ झोप लागावी म्हणून आई इच्छा नसतानाही आपल्या भुकेल्या मुलाला झोपेचे औषध देत असते. असे भयावह दृश्य अफगाणिस्तानात पाहायला मिळतंय. जेव्हापासून या देशात तालिबानची सत्ता आली, तेव्हापासून या देशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
तालिबान ताब्यात आल्यानंतर देशाची स्थिती
15 ऑगस्ट 2021 चा तो काळा दिवस, जेव्हा पुन्हा एकदा तालिबान अफगाणिस्तानात सत्तेवर आले. या दिवसापासून लोकांचे आणि विशेषतः महिलांचे जीवन उद्धवस्थ होऊ लागले. अफगाणिस्तान आधीच अनेक संकटांचा सामना करत होता आणि अशा परिस्थितीत तालिबान राजवटीने या देशाची स्थिती आणखी बिकट करण्याचे काम केले. युनायटेड नेशन्स वर्ल्ड फूड प्रोग्राम (WFP) नुसार, अफगाणिस्तानची निम्मी लोकसंख्या अन्नावाचून मरत आहे. 95 टक्के लोकसंख्येकडे खायला पुरेसे अन्न नाही. या देशात पाच वर्षांखालील दहा लाखांहून अधिक मुले गंभीर कुपोषणाची शिकार झाली आहेत.
अफगाणिस्तान भुकेशी झुंज देत आहे
आधीच आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट आल्यानंतर आंतरराष्ट्रीय मदतही पूर्णपणे बंद झाली आहे. ह्युमन राइट्स वॉचच्या तज्ज्ञांच्या मते, 15 ऑगस्ट 2021 पासून अफगाण लोकांचे जीवन नरकासारखे झाले होते. देश जगातील सर्वात वाईट मानवी संकटाचा सामना करत आहे. लोकं भुकेने मरत आहेत.
तालिबानचं म्हणणं काय?
सध्याच्या परिस्थितीबद्दल, हेरातमधील तालिबानच्या प्रांतीय सरकारचे प्रवक्ते हमीदुल्ला मोतावकील म्हणाले "अफगाणिस्तानवर आंतरराष्ट्रीय निर्बंध आणि अफगाण मालमत्ता गोठवली आहे. तालिबान नोकऱ्या निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला लोखंडाच्या खाणी आणि गॅस पाइपलाइन प्रकल्प सुरू करायचा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :