एक्स्प्लोर
येमेनमध्ये अंत्ययात्रेवर हल्ला, 140 जणांचा मृत्यू, 525 जखमी
सना : येमेनमधील एका अंत्ययात्रेवर झालेल्या हवाई हल्ल्यात तब्बल 140 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर अंदाजे 525 जण जखमी झाल्याची माहिती आहे. सौदीच्या नेतृत्वात हा हवाई हल्ला करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली असून सौदीतील हथी बंडखोरांनी हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हवाई हल्ल्यात शेकडो निष्पाप नागरिकांना प्राण गमवावं लागणं, आणि 525 जणांना दुखापती होणं ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचं सना शहरातील आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.
अंत्ययात्रेसाठी एका सभागृहात सर्व नागरिक जमले होते, त्याचवेळी हा हल्ला झाला. प्रत्यक्षदर्शीनी घटनास्थळी रक्ताचे पूर वाहिल्याचं म्हटलं आहे. मार्च 2015 मध्ये सुरु झालेल्या अँटी बॉम्बिंग कॅम्पेननंतर झालेल्या सर्वात शक्तिशाली हल्ल्यांपैकी हा एक असल्याचं म्हटलं जातं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement