Health Tips : रक्ताचा एक थेंब वाचवेल अनेक जीव, जाणून घ्या रक्तदानाविषयीचे समज आणि गैरसमज
आज जागतिक रक्तदान दिन. रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान समजले जाते. अनेकांचे जीव या रक्ताच्या साहाय्याने वाचवले जातात. मात्र रक्तदानाबद्दल लोकांच्या मनात बरेच गैरसमज आहेत.
World Blood Donor Day : रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान मानले जाते. रक्तदान केल्याने अनेक लोकांना जीवदान मिळते. तुमच्या रक्ताचा एक थेंब इतका मौल्यवान असू शकतो याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही.आज जागतिक रक्तदान दिन साजरा केला जात आहे. या दिवसाची सुरूवात 2005 साली हेल्थ असेंब्लीकडून करण्यात आली होती. जगभरातील सर्व गरजू तसेच शरीरात रक्ताची कमतरता तसेच अभाव असलेल्या व्यक्तींना रक्त प्राप्त व्हावे यासाठी हा दिवस दर वर्षी साजरा केला जातो.
जनतेत रक्तदानाविषयी जागृकता निर्माण करणे त्यांना रक्तदानाचे फायदे आणि गरज लक्षात आणून देणे जेणेकरून जास्तीत जास्त व्यक्ती रक्तदान करतील हा देखील रक्तदाता दिवस साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. जे लोक दरवर्षी गरजुंना आपले रक्त देत असतात अशांचा सन्मान करण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो. आकडेवाडीनुसार प्रत्येक दोन सेकंदात एकातरी व्यक्तिला रक्ताची आवश्यकता भासते. यामुळे अनेक प्राणघातक आजार बरे होऊ शकतात. मात्र रक्तदानाबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात गैरसमज आहेत. आज जागतिक रक्तदानाबद्दल रक्तदानाचे महत्व जाणून घेऊयात.
रक्तदान करणे का गरजेचे आहे
रक्तदान केल्याने अनेक लोकांचे प्राण वाचतात. पण लोकांच्या मनात रक्तदानाविषयी मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. यामुळे लोक रक्तदान करणे टाळतात.
रक्तदानाबद्दलच्या अफवा
रक्तदान करण्याकरता अनेक लोक घाबरतात.ते रक्तदान करण्याकरीता मुळीच उत्सुक नसतात. त्यांना वाटते की रक्तदान केल्यास शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते, अशक्तपणा येतो तसेच इंफेक्शन होऊ शकते.
रक्तदान करणे वेदनादायक आहे का?
रक्तदान केल्यावर वेदना होणे हे खूपच साधारण आहे. मात्र प्रत्येकाच्या शरीरातील प्रतिकारशक्तीनुसार यात बदल असू शकते.
रक्तदान केल्यावर अशक्तपणा आणि थकवा येतो का?
रक्तदान केल्यानंतर अगदी काही वेळापुरते थकवा आणि अशक्तपणा तुम्हाला जाणवू शकतो. शरीरातील ऊर्जेची पातळी राखून ठेवण्यासाठी चांगला आहार, पूर्ण वेळ झोप, शरीरातील पाण्याची पातळी हे सर्व नियंत्रित ठेवावे.
रक्तदान केल्यावर इंन्फेक्शनचा धोका वाढतो का?
रक्तदान करणे खूप सुरक्षित आहे. रक्त देणारा आणि घेणारा या दोन्ही व्यक्तींच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. रक्तदान करताना प्रत्येक वेळी नवीन सुई वापरली जाते आणि त्याचे निर्जंतुकीकरण केले जाते.
शरीरावरील भागांवर गोंदलेले असल्यास ते लोक रक्तदान करू शकतात का?
शरीरावर टॅटू असल्यास ते लोक रक्तदान करू शकत नाहीत. मात्र टॅटू करून तुम्हाला सहा महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले असतील तर तुम्ही रक्तदान करू शकता. एखाद्या हेल्थ प्रोफेशनल कडून तुम्ही टॅटू काढून घेतला असेल आणि तुमची जळजळ कमी झालेली असल्यास 12 तासाच्या आत तुम्ही रक्तदान करू शकता.
इतर महत्वाच्या बातम्या
Avatar Sequels Release Date : 'अवतार'च्या सीक्वेलची रिलीज डेट ढकलली पुढे; 2025 मध्ये होणार प्रदर्शित
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )