(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कसोटी सामन्यात टी20 सारखी फलंदाजी; सर्वात जलद शतक कोणी झळकावले?, यादीत एकही भारतीय नाही
Fastest Century in Test: कसोटी क्रिकेटच्या फॉरमॅटमध्येही आक्रमक फलंदाजी करून इतिहास रचणारे अनेक फलंदाज होते.
Fastest Century in Test: कसोटी क्रिकेटची सुरुवात 1877 मध्ये झाली. या फॉरमॅटमध्ये फलंदाज अनेकदा मोठे डाव खेळण्याचा प्रयत्न करतात. दुहेरी आणि तिहेरी शतके ही कसोटी क्रिकेटमधील मोठी उपलब्धी मानली जाते. मात्र, या फॉरमॅटमध्येही आक्रमक फलंदाजी करून इतिहास रचणारे अनेक फलंदाज होते. आज आम्ही तुम्हाला जगातील अशा 10 फलंदाजांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावले आहे.
1. ब्रँडम मॅक्युलम
न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज ब्रँडम मॅक्युलम कसोटी क्रिकेटमध्ये टी-20 सारखी फलंदाजी केली होती. 2016 मध्ये मॅक्युलमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 54 चेंडूत शतक झळकावून इतिहास रचला होता. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा तो फलंदाज आहे.
2- विव्ह रिचर्ड्स
वेस्ट इंडिज क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाज सर व्हिव्ह रिचर्ड्स यांनी 1986 मध्ये केवळ 56 चेंडूत शतक झळकावले होते. विव्ह रिचर्ड्सने इंग्लंडविरुद्ध हा पराक्रम केला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम जवळपास 28 वर्षे विव्ह रिचर्ड्सच्या नावावर होता.
3- मिसबाह उल हक
पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह-उल-हक अनेकदा संथ फलंदाजी करताना दिसला. एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्येही मिसबाहवर त्याच्या संथ फलंदाजीमुळे टीका करण्यात आली. मात्र, सुमारे आठ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात मिसबाहने अवघ्या जगाला चकित केले होते. या कसोटीत मिसबाहने अवघ्या 56 चेंडूत शतक झळकावले होते.
4- ॲडम गिलख्रिस्ट
या यादीत ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्ट चौथ्या स्थानावर आहे. 2006 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात गिलख्रिस्टने अवघ्या 57 चेंडूत शतक झळकावले होते. कसोटीत सर्वात जलद शतक झळकावणारा तो ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे.
5- जेएम ग्रेगरी
सुमारे 102 वर्षांपूर्वी 1921 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या जेएम ग्रेगरीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इतिहास रचला होता. त्यावेळी त्याने कसोटी क्रिकेटमधील सर्वात जलद शतक झळकावले होते. जेएम ग्रेगरीने अवघ्या 67 चेंडूत शतक झळकावले. मात्र, आज सर्वात जलद शतक झळकावणारा तो पाचवा फलंदाज ठरला आहे.
6- शिवनारायण चंद्रपॉल
वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल त्याच्या संथ फलंदाजीसाठीही ओळखला जात होता. मात्र, 2002 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने अवघ्या 69 चेंडूत शतक झळकावले होते.
7- डेव्हिड वॉर्नर
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरनेही कसोटी क्रिकेटमध्ये 69 चेंडूत शतक झळकावले आहे. वॉर्नरने भारताविरुद्ध हा पराक्रम केला होता.
8-ख्रिस गेल
ख्रिस गेल टी-20 क्रिकेटचा महान फलंदाज म्हणून ओळखला गेला. ख्रिस गेलने कसोटी क्रिकेटमध्ये 70 चेंडूत शतक ठोकले आहे. गेलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे स्फोटक शतक झळकावले होते.
9- आरसी फेड्रीक्स
वेस्ट इंडिजच्या आरसी फेड्रीक्सने 1975 मध्येच 71 चेंडूत शतक झळकावले होते. मात्र, या विक्रम यादीत तो 9व्या क्रमांकावर आहे.
10- कॉलिन डी ग्रँडहोम
न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कॉलिन डी ग्रँडहोमने वेस्ट इंडिजविरुद्ध अवघ्या 71 चेंडूत शतक झळकावले. हा पराक्रम त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध केला होता.