मुलांना शाळेत घालताय? मग जाणून घ्या LKG आणि UKG चा नेमका अर्थ काय...
शाळेत असताना आपण नेहमी LKG, UKG हा शब्द वारंवार एेकला आहे. पण याच LKG, UKG चा सुद्धा एक वेगळा लाँग फाॅर्म आहे. याचा नेमका संपूर्ण अर्थ काय जाणून घेऊयात.
What Is LKG And UKG : उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्यानंतर मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही शाळेची चाहूल लागते. मुलं जर लहान असतील तर त्यांना सवय लागावी म्हणून शाळेत पाठवलं जातं. लहान मुलांच्या शाळेबद्दल चर्चा चालू झाली की सर्वात प्रथम LKG, UKG क्लासेसचे नाव समोर येते. सर्वच मुले सुरुवातीस नर्सरी नंतर एलकेजी आणि यूकेजीमध्ये अॅडमिशन घेतात. तिथे लहान मुले अनेक अॅक्टिव्हिटीज करतात आणि अतिशय मजेशीर गोष्टी आणि गाणे शिकतात. अक्षरांची आणि अंकांची ओळख लहान मुलांना करुन देण्यात येते. पण कधी विचार केला आहे का LKG आणि UKG या शब्दांचा नेमका अर्थ काय आहे?
What Is LKG : एलकेजीचा फुल फॉर्म काय?
LKG चे पूर्ण रूप लोअर किंडरगार्डन आहे. प्ले ग्रुप आणि नर्सरी नंतरचा हा पुढचा वर्ग आहे. इथपर्यंत पोहोचल्यानंतरही मुलं विशेष अभ्यास करत नाहीत, तर अगदी प्राथमिक गोष्टी शिकतात. या वर्गात प्रामुख्याने जसे चित्र ओळखणे, रेषा काढणे, रेखाचित्रे काढणे, कविता पाठ करणे इत्यादी शिकतात. या वर्गात काही लेखन कार्यही सुरू होते. ज्यामुळे ते लिहायला शिकतात.
What Is UKG: यूकेजीचे पूर्ण रूप काय?
लोअर किंडरगार्टनच्या वरचा एक वर्ग हा अप्पर किंडरगार्डन आहे आणि हेच UKG चे पूर्ण रूप आहे. हे दोन्ही वर्ग त्यांच्या शॉर्ट फॉर्ममध्ये अधिक प्रसिद्ध आहेत, त्यांना LKG आणि UKG म्हणून ओळखले जाते. एलकेजी पूर्ण केल्यानंतर यूकेजीमध्ये प्रवेश घेतला जातो.
किंडरगार्डन चा अर्थ काय आहे
या वर्गांमध्ये अभ्यासाला फारसे महत्त्व देत नाहीत आणि मुलांचे बालपण जपले जावे, त्यामुळेच किंडरगार्डन हे नाव दिले गेले असावे. बालवाडी म्हणजे मुलांसाठी खेळण्यासाठीची बाग. LKG आणि UKG हे मूलभूत वर्ग मानले जातात जिथे त्यांना अभ्यासाची ओळख करून दिली जाते. या वर्गांवर अभ्यासाचे विशेष दडपण नसते, मात्र ते शाळांवर देखील अवलंबून असते.
अभ्यासाची केली जाते पूर्वतयारी
नर्सरी, एलकेजी आणि यूकेजीमध्ये अभ्यासाचे विशेष ओझे नसते. पण काही शाळा अशाही असतात की ज्या ठिकाणी पहिलीच्या वर्गात प्रवेश घ्यायचा असेल तर पूर्वपरीक्षा द्यावी लागते. मग त्यासाठी एलकेजी आणि यूकेजीमध्येच याची तयारी करुन घेतली जाते.
ही बातमी वाचा :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI