एक्स्प्लोर

Western Railway Mega Block: पश्चिम रेल्वेवर 'जम्बो मेगाब्लॉक'; 330 हून अधिक लोकल सेवा होणार रद्द, घराबाहेर पडण्याआधी पाहा A टू Z माहिती

Western Railway Announced Major Mega Block: पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

Western Railway Announced Major Mega Block: मुंबईची आणि मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलच्या (Mumbai Local) प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक (Western Railway Mega Block) जाहीर करण्यात आला आहे. 24, 25 आणि 26 जानेवारीच्या रात्री हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान पश्चिम रेल्वेवरील जवळपास 330 पेक्षा जास्त लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी पश्चिम रेल्वेने मेगा ब्लॉक घेत असल्याचे सांगितले आहे. या ब्लॉकमुळे, शुक्रवार/शनिवारच्या रात्री 127 उपनगरीय सेवा रद्द केल्या जातील आणि शनिवार/रविवारच्या रात्री सुमारे 150 उपनगरीय लोकल सेवा रद्द केल्या जातील. याव्यतिरिक्त, सुमारे 60 उपनगरीय सेवा रद्द केल्या जाणार आहे.

24 जानेवारी (शुक्रवारी) रात्री 11 ते शनिवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक राबविला जाईल. या काळात डाऊन फास्ट मार्गावर देखील रात्री 12.30 ते सकाळी 6.30 वाजेपर्यंत ब्लॉक राहील. तसेच 25 आणि 26 जानेवारीला रात्री 11 ते रविवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत अप आणि डाऊन स्लो आणि डाऊन फास्ट मार्गांवर ब्लॉक सुरू होईल. जलद मार्गावर शनिवारी रात्री 11 वाजता ब्लॉक सुरू होऊन रविवारी सकाळी 7.30 वाजेपर्यंत ब्लॉक राहील. 24 जानेवारीला शेवटची चर्चगेट-विरार स्लो लोकल रात्री 11.58 वाजता सुटेल. रात्री 11 वाजेपासून चर्चगेटवरून सुटणाऱ्या सर्व स्लो लोकल मुंबई सेंट्रल आणि सांताक्रूझ दरम्यान जलद मार्गावर धावतील. यावेळी महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्थानकांवर लोकल थांबणार नाही.

चर्चगेटवरून पहिली डाउन फास्ट लोकल सकाळी 6.14 वाजता सुटणार-

24 जानेवारीला रात्री 11 वाजेनंतर विरार, भाईंदर आणि बोरिवलीहून सुटणाऱ्या स्लो गाड्या सांताक्रूझ आणि मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर धावतील. याव्यतिरिक्त, काही पश्चिम रेल्वे लोकल हार्बर मार्गावर गोरेगाव आणि वांद्रे दरम्यान धावतील. 25 जानेवारी (शनिवारी) सकाळी विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईंदर आणि बोरिवली येथून येणाऱ्या स्लो आणि फास्ट लोकल अंधेरी येथे थांबतील. ब्लॉकनंतर चर्चगेटकडे जाणारी पहिली फास्ट लोकल शनिवारी सकाळी 5.47 वाजता विरारहून सुटेल आणि चर्चगेटला सकाळी 7.05 वाजता पोहोचेल. चर्चगेटवरून पहिली डाउन फास्ट लोकल सकाळी 6.14 वाजता सुटेल आणि चर्चगेटवरून पहिली डाउन स्लो लोकल ब्लॉकनंतर सकाळी 8.03 वाजता सुटेल. याशिवाय, या ब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होईल.

पुढील लांब पल्ल्याच्या गाड्यां रद्द-

12267 Mumbai Central–Hapa Duronto Express (25th January 2025)

12268 Hapa-Mumbai Central Duronto Express (26th January 2025)

12227 Mumbai Central–Indore Duronto Express (25th January 2025)

12228 Indore-Mumbai Central Duronto Express (26th January 2025)

पुढील गाड्या बोरिवलीहून सुटणार-

09052 Bhusaval–Dadar Special (25th January 2025) – Short terminates at Borivali.

12927 Dadar–Ekta Nagar Superfast Express (25th January 2025) – Short originates from Borivali.

19003 Dadar–Bhusaval Khandesh Express (26th January 2025) – Short originates from Borivali.

19015 Dadar–Porbandar Saurashtra Express (26th January 2025) – Short originates from Borivali.

22946 Okha–Mumbai Central Saurashtra Mail (25th January 2025) – Short terminates at Borivali.

12902 Ahmedabad–Dadar Gujarat Mail (25th January 2025) – Short terminates at Palghar.

59024 Valsad–Mumbai Central Passenger (26th January 2025) – Short terminates at Borivali.

59045 Mumbai Central–Vapi Passenger (26th January 2025) – Short originates from Borivali.

12904 Amritsar–Mumbai Central Golden Temple Mail (24th January 2025) – Short terminates at Andheri.

19016 Porbandar–Dadar Saurashtra Express (24th January 2025) – Short terminates at Borivali.

संबंधित बातमी:

AC लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची आता खैर नाही, रेल्वे बोर्डाचं मोठ पाऊल, विनातिकीट सापडल्यास....

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Maharashtra Weather Update: राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल,  हवामान विभागानं काय दिला अंदाज?
राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल, हवामान विभागानं काय दिला अंदाज?
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
Guess Who: लेकाला बॉलिवूड 'किंग' बनवण्यासाठी बापानं गहाण ठेवलेलं घर अन् गाड्या; डेब्यू फिल्मनं रातोरांत बनला 'सुपरस्टार'
लेकाला बॉलिवूड 'किंग' बनवण्यासाठी बापानं गहाण ठेवलेलं घर अन् गाड्या; डेब्यू फिल्मनं रातोरांत बनला 'सुपरस्टार'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Maharashtra Weather Update: राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल,  हवामान विभागानं काय दिला अंदाज?
राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल, हवामान विभागानं काय दिला अंदाज?
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
Guess Who: लेकाला बॉलिवूड 'किंग' बनवण्यासाठी बापानं गहाण ठेवलेलं घर अन् गाड्या; डेब्यू फिल्मनं रातोरांत बनला 'सुपरस्टार'
लेकाला बॉलिवूड 'किंग' बनवण्यासाठी बापानं गहाण ठेवलेलं घर अन् गाड्या; डेब्यू फिल्मनं रातोरांत बनला 'सुपरस्टार'
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Embed widget