एक्स्प्लोर

वाशिममध्ये दिगंबर आणि श्वेतांबर एकमेकांना भिडले, भगवान पार्श्वनाथांच्या मूर्ती लेपनावरुन फ्री स्टाईल हाणामारी

Washim : न्यायालयाच्या आदेशानंतर तब्बल 42 वर्षांनंतर वाशिममधील हे मंदिर उघडलं होतं. आता पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. 

वाशिम: कधी लाथा तर कधी बुक्क्या, कधी पायताण तर कधी खुर्च्या... हे सगळं सुरु आहे ते जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या भगवान पार्श्वनाथांच्या मंदिरासमोर. वाशिममधील तब्बल 42 वर्षांनतर उघडलेल्या मंदिरातील भगवान पार्श्वनाथांच्या मूर्तीच्या लेपनावरुन वाद झाला आणि त्या नंतर दिगंबर आणि श्वेतांबर हे दोन पंथिय एकमेकांना भिडले. 

त्याचं झालं असं की वाशिमच्या शिरपूर जैन या गावात भगवान पार्श्वनाथांच्या मूर्तीवरच्या लेपनावरुन श्वेतांबर आणि दिगंबर पथियांमध्ये वाद सुरु झाला. श्वेतांबर पंथियांनी लेपनाच्या बहाण्याने मूर्तीचं रुपच बदलण्याचा घाट घातल्याचा आरोप दिगंबर पंथियांनी केला. 

भगावन पार्श्वनाथांच्या मूर्तीच्या सुरक्षेसाठी श्वेतांबर पंथियांनी बाऊंसर लावले. वादाला तोंड फुटलं आणि प्रकरण हाणामारीपर्यंत गेलं. त्यात कुणाची डोकी फुटली तर कुणाची कंबरडी मोडली. अखेर श्वेतांबर पंथियांनी लेपन प्रक्रिया थांबवली 

दोन्ही पंथीयांमध्ये 125 वर्षांपासून मूर्ती हक्कावरून वाद सुरु आहे. याच वादातून मंदिराला अखेर कुलुप लागलं. त्यानंतर 42 वर्षानंतर मंदिराचं दार उघडलं. दर्शनासाठी मंदिर खुले करण्याचं आणि मूर्तीला लेप करण्याचे कोर्टाने आदेश दिले. 11 मार्च रोजी श्वेतांबर पथांकडे मंदिराच्या चाव्या देण्यात आल्या. पण मूर्तीला लेपनचा अधिकार श्वेताबंर पंथियांना दिला होता. 

लेपन करण्यासाठी श्वेताबंर पंथियांनी कुलुप लावलं. 14 मार्च रोजी दिगंबर पंथियांनी मंदिराचा दरवाजा उघडून प्रवेश मिळवला. मंदिराचा दरवाजा चुकीच्या पद्धतीने उघडल्याचा आरोप श्वेतांबर पंथियांनी केला. 

त्यानंतर वाढलेल्या तणावामुळे शनिवारी दिवसभर या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज जुन्याजाणत्यांनी दोन्ही पंथियांमध्ये समेटही घडवली. पण ही अहिंसक वृत्ती जेमतेम तासभर टिकली आणि पुन्हा सुरु झाली फ्री स्टाईल हाणामारी. 

जैन समाजाच्या यच्चयावत 14 तीर्थंकारांनी अहिंसेची शिकवण देऊनही त्यांचे अनुयायी एकमेकांची डोकी आणि गुडघे फोडणार असतील तर सगळंच व्यर्थ आहे. 

ले अनेक दशक  मंदिराच्या  मूर्ती हक्कावरून  वाद  झाला आणि परिणामी 42 वर्ष वाया गेले. चुकीच्या  पद्धतीने  पुन्हा  टाळे  लावणे  योग्य नसून सर्वोच्च  न्यायालयाने  मंदिर उघडल्याने   गावाचा  आणि परिसराचा  विकास होईल असं वाटलं होतं.  दोन्ही पंथीयांने   सामोपचाराने  मार्ग काढावा  आणि जर मार्ग काढता येत नसेल तर प्रशासनाने ताब्यात घेऊन मंदिर  दर्शनासाठी नेहमी उघडे करावे  अशी मागणी गावातील नागरिक करत आहेत.

ही बातमी वाचा: 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget