HSC results 2025 विदर्भकन्या राज्यात पहिली; 12 वी बोर्ड परीक्षेत मितालीला 99 टक्के गुण, 3 विषयांत 100%
राज्यात 12 वी परीक्षेच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून प्रथम येण्याचा मान देखील विदर्भकन्येला मिळाला आहे

वाशिम : राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेत (HSC results) यंदा मुलींनीच बाजी मारली असून राज्यात पहिली येण्याचा बहुमान विदर्भातील मितालीने मिळवला आहे. फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल जाहीर झाला असून 91.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात नेहमीप्रमाणे कोकण विभागाने आगेकूच करत सर्वाधिक 96.74 टक्के मिळवत अव्वल स्थान कायम ठेवले आहे. तर सर्वात तळाला लातूर विभागाने 89.46 टक्के मिळवले आहे. मात्र, वाशिमच्या (washim) मिताली काबरा हिने विज्ञान शाखेत 99 टक्के गुण मिळवत राज्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्ण तिची टक्केवारी 94. 58% असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51 आहे म्हणजे मुलींची उत्तर नेत्यांची टक्केवारी मुलांपेक्षा 5.07 टक्के ने जास्त आहेत.
राज्यात 12 वी परीक्षेच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून प्रथम येण्याचा मान देखील विदर्भकन्येला मिळाला आहे. मिताली (594/600) गुण मिळवत राज्यातून प्रथम आली असून 3 विषयात तिला 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. मितालीने फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित या विषयांत 100 पैकी 100 गुण मिळवत 100% गुण प्राप्त केले आहेत. वाशिममधील तोरनाळा गावच्या ममता ज्युनिर कॉलेजची ती विद्यार्थिनी आहे. तिच्या या यशाबद्दल तिच्या कॉलेज आणि तालुक्यातून तिचं कौतुक व अभिनंदन केलं जात आहे.
यंदाच्या निकालाचे वैशिष्ट्य काय?
- या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण 14,27,085 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,17,969 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी 91.88 आहे.
- खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 36,133 एवढी असून त्यापैकी 35,697 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 29,892 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 83. 73 आहे.
- या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 42,388 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 42,024 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट अग्ले. त्यापैकी 15,823 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 37.65 आहे.
- या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 7,310 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी7, 258 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 6, 705 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 12.38 आहे.
- बारावीच्या परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
विभागनिहाय निकाल (HSC result 2025 Region Wise Result Statistics)
पुणे – 91.32%
नागपूर – 90.52%
संभाजीनगर – 92.24%
मुंबई – 92.93%
कोल्हापूर – 93.64%
अमरावती – 91.43%
नाशिक – 91.31%
लातूर – 89.46%
कोकण – 96.74%
हेही वाचा
मोठी बातमी! राहुल गांधी मोदींच्या भेटीला, सरन्यायाधीशही हजर; सीमारेषेवर तणाव, दिल्लीत बैठकांची धाव
























