Wardha Latest News : क्षुल्लक कारणावरुन बाप-लेकात वाद, रागाच्या भरात बापाने मुलाला संपवलं
Wardha Latest Crime News : डोक्यावर जड वस्तूने गंभीर प्रहार करत पित्यानेच आपल्या 32 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Wardha Latest Crime News : डोक्यावर जड वस्तूने गंभीर प्रहार करत पित्यानेच आपल्या 32 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पिपरी मेघे परिसरातील बेघर वस्ती येथे घडली आहे. या घटनेने वर्ध्यात चांगलीच खळबळ निर्माण झाली असून आरोपी पित्याला रामनगर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. विशाल चचाणे (32) असं मृत युवकाचं नाव असून नारायण चचाने असं आरोपी वडीलांचं नाव आहे. मुलगा आणि वडील यांच्यामध्ये घरगुती कारणावरून वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेला आणि वडिलांनी मुलाला ठार केलं. आई घरी नसताना वडिलांनी मुलाला ठार केलं. आई घरी परत आल्यानंतर मुलगा चटईवर निपचित पडून तिला दिसला. घरगुती कारणावरून राग मनात धरून बापानेच मुलाला संपवलं..
नेमकं काय झालं?
मृतक विशाल हा मागील तीन महिन्या पासून बाहेरगावी कंपनीत काम करत होता. आणि तेथेच राहत होता. 5 जुलै ला रात्री विशाल घरी आला. रात्री घरीच थांबला आणि 6 जुलैला विशाल बँकेत गेला आणि 8000 रुपये काढून घरी परत आला. हे पैसे त्याने वडिलांसमोर आईला दिले.. त्याच दिवशी दुपारी कामावर कंपनीत जाण्याकरीता निघाला.. विशालची आई ही बाहेर स्वयंपाक काम करत असून.. मातोश्री मंगल कार्यालय येथे लग्नाच्या कार्यक्रमात स्वयंपाक करण्याकरीता गेली. तेव्हा घरात आरोपी बाप नारायण चचाने हजर होता..आई रात्रभर मातोश्री मंगल कार्यालयात होती..
आई घरी आल्यानंतर आईला बसला धक्का ?
कामावरून आई सकाळी 9 वाजता घरी परत आली तेव्हा नवरा नारायन चचाने घरातच होता.मुलगा विशाल हा घरात चटईवर झोपला दिसला होता..त्यावेळी त्याचे नाक, कान व डोक्या वरून रक्त निघत होते. त्याला रक्ताच्या थारोळ्यात बघून अक्षरशः आईला धक्काच बसला आणि तिने एकच हंबरडा फोडला.. आईने मुलाला स्पर्श केल्यानंतर तो मृतावस्थेत दिसल.त्याच्या डोक्यावर जड वजनी वस्तुने प्रहार केल्याने वडिलांनीच त्याला ठार केल्याचं समजलं...
पत्नी,मुलांना सोडून गेलेला आरोपी एक वर्षा आधी आला होता परत ?
आरोपी नारायन चचाने हा मुले लहान असतानाच पत्नी व मुलांना सोडून दुस-या महिले सोबत निघून गेला होता. ती महिला मरण पावल्याने... आरोपी हा परत आपल्या पत्नी आणि मुलांकडे मागील एक वर्षांपासून आला होता.नवरा नारायन चचाने हा पत्नीला नेहमी शिवागाळ करीत होता.. तेव्हा मृतक विशाल हा त्याला शिवीगाळ करण्यास हटकत होता..बुधवारी विशालने त्याच्या आईला 8 हजार रुपये दिले आणि आरोपी नारायन ला काहीही दिले नाही. या गोष्टाचा मनात राग धरून आरोपी वडील नारायन चचाने ने विशालच्या डोक्यावर गंभीरपणे मारून त्याचा जीवानिशी ठार केले आहे अशी तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात आईने दाखल केली आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.. वर्धा जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून सतत खुणांच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत..