'सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाऱ्यांना शुद्ध करणारी मशीन,पावडर शोधलीये', विजय वडेट्टीवार यांची एकनाथ शिंदेंवर टीका
पहिले सरकार आलिबाबा चाळीस चोर होते आताचे सरकार आहे दोन आलिबाब आणि ऐंशी चोर आहे. आता दोन आलिबाबा झाले आहे. या दोघांमध्ये स्पर्धा लागली आहे कोण जास्त तिजोरी लुटतो, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
वर्धा: विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "महाराष्ट्रात 21 लोक जे ईडीच्या रडारवर होते. ते सत्तेत गेले म्हणजे सफाई झाली, स्वच्छही झाले. शिंदे काही खोटं बोलले नाहीच, ते अजिबात खोटं बोलत नाहीत. माणसाला शुद्ध करणारी नवीन मशीन आणि पावडर त्यांनी शोधलीय, असं वडेट्टीवार म्हणाले. हे सांगताना त्यांनी उदाहरण दिलं. "बस में छह गधे चढे उसमें से तुम उतर गये हो.. तो बचे कितने? उसने कहा पाच... हेच त्याचे उत्तर आहे," असं वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना म्हटलं.
वर्ध्यात कंत्राटी पदभरतीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी वडेट्टीवार वर्ध्यात आले होते. यावेळी माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. वडेट्टीवार म्हणाले, सध्याचे सरकार हे लुटारूंचे सरकार आहे. परीक्षेसाठी तरुणांकडून पैसे घेतले जात आहे. पैसे कमविण्याचा धंदा सुरू केला आहे. परीक्षा नाही झाली तर पैसे परत दिले जात नाही. व्याजावर व्याज कमविण्याचं काम हे सरकार करत आहे. पहिले सरकार आलिबाबा चाळीस चोर होते आताचे सरकार आहे दोन आलिबाब आणि ऐंशी चोर आहे. आता दोन आलिबाबा झाले आहे. या दोघांमध्ये स्पर्धा लागली आहे कोण जास्त तिजोरी लुटतो.
महात्मा गांधीचा राम ऐकला नाही त्यामुळे भोगायची पाळी आली
आपल्याच चुका आहेत, आपणच धर्म जात पातीच्या भानगडीत पडलो. राम मंदिर देवाचं आहे पण राम आमच्या हृदयात आहे हे आम्ही सांगितलं नाही. ते म्हणाले त्यामुळे म्हणत गेलो, पण आम्ही राम पहिलेपासून मानत होतो. महात्मा गांधी राम मानत होते. ते आम्ही ऐकलं नाही या मनुवाद्यांचा राम ऐकला. गांधींचा राम ऐकला नाही त्यामुळे भोगायची पाळी आली आहे. आता भोगावं तर लागणारच आहे. चुका आताही दुरुस्त करता येतील आताही वेळ गेली नाही. चूक दुरुस्त करा आणि पुढे जा, असे आवाहन विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी बेरोजगार तरुणांना केले आहे.
हे ही वाचा :