(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Supriya Sule : माझ्यामुळे पक्षाला अपयश मिळालं असेल तर स्वीकारते, यालाच लीडरशीप म्हणतात; सुप्रिया सुळेंचा प्रफुल्ल पटेलांवर वार
Supriya Sule On Praful Patel : दिल्लीतील सहा जनपथ जसं माझं घर होतं, तसं प्रफुल्ल पटेलांचंही घर होतं, पण त्यांनी असं का केले माहिती नाही असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
नागपूर: प्रफुल पटेल (Praful Patel) यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणती घुसमट होत होती ते त्यांनाच माहीत, आठवड्यातून तीन वेळा ते शरद पवारांच्या (Sharad Pawar) दिल्लीतील घरी भेटायचे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या. पक्षाला आतापर्यंत यश मिळालं ते तुमच्यामुळे मिळालं आणि अपयश माझ्यामुळे मिळालं असं जर तुम्ही समजत असाल तर ते मी स्वीकारते असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी नागपूर शहर, ग्रामीण, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील पक्ष संघटनेचा आढावा घेतला. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, "सहा दशके शरद पवार यांचा संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांसोबत ऋणानुबंध आहे. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणती घुसमट होत होती ते त्यांनाच माहीत असेल. आठवड्यातून तीन वेळा ते शरद पवारांच्या दिल्लीतील घरी भेटायचे. सहा जनपथ जसे माझे घर होते तसेच त्याचे पण घर होते. पक्षाला जे यश मिळाले ते प्रफुल पटेल यांच्यामुळे मिळालं आणि अपयश हे माझ्यामुळे असेल तर ते मी स्वीकारते, यालाच लीडरशिप म्हणतात."
दिल्लीतून महाराष्ट्राचे खच्चीकरण
दिल्लीतील अदृश्य शक्तीने महाराष्ट्रातील मराठी माणसांनी उभे केलेले दोन पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडले. त्यामुळे मराठी माणसाचं प्रचंड नुकसान झालं. महाराष्ट्रात पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला आधी उपमुख्यमंत्री नंतर हाफ मुख्यमंत्री केले. त्यामुळे दिल्लीतले अदृश्य हात महाराष्ट्राचे खच्चीकरण करत असल्याचं दिसून येतंय.
ही बातमी वाचा: