(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर्स; यवतमाळनंतर वर्ध्यातही तसाच प्रकार?
PM Narendra Modi : वर्ध्यात पंतप्रधानांच्या सभेस्थळी ठेवण्यात आलेल्या खुर्च्यांवर काँग्रेसनेते राहुल गांधीचा फोटो असलेल्या जाहिरातींचे स्टिकर्स लावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Lok Sabha Election 2024 : विदर्भात (Vidharbha) दुसऱ्या टप्प्यात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुन्हा विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 19 एप्रिलला वर्ध्यात (Wardha Lok Sabha) येत आहेत. वर्धा आणि अमरावती लोकसभेतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान पुन्हा विदर्भवारी करणार आहेत. वर्ध्याच्या तळेगाव येथील श्यामजीपंत येथील प्रगती मैदानावरच्या 32 एकर जागेत या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महायुतीच्या वतीने या सभेसाठी मागील काही दिवसांपासून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
असे असताना यवतमाळ येथे घडलेल्या प्रकार आज वर्ध्यात देखील घडल्याने या सभेची चांगलीच चर्चा होताना दिसतेय. पंतप्रधानांच्या सभेस्थळी ठेवण्यात आलेल्या खुर्च्यांवर काँग्रेसनेते राहुल गांधीचा फोटो असलेल्या जाहिरातींचे स्टिकर्स लावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, हा प्रकार यापूर्वी घडलेल्या यवतमाळमधील सभेप्रमाणेच तर नाही ना, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय.
पंतप्रधानांच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर्स?
वर्ध्यातील आर्वी तालुक्यातील तळेगाव येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सायंकाळी जाहीर सभा होत आहे. त्याकरिता येथे जय्यत तयारी केली असून मोठा जणसागर या सभेला उपस्थित राहील, असा दावा भाजपने केला आहे. या सभेस्थळी मोठ्याप्रमाणात बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली असून हजारो खुर्च्यांची या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, या खुर्च्यांवर चक्क काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाची जाहिरात करणारे स्टिकर्स आढळून आले आहे. नेमका हा प्रकार काय किंवा कोणी मुद्दाम या खोडसाळपणा केलाय का, असे अनेक तर्कवितर्क आणि चर्चाना उत आलाय.
यातील काही खुर्च्यांवरील स्टिकर्स अर्धवट फाडले असले तरी काही खुर्च्यांवर मात्र स्पष्ट राहुल गांधी आणि पंजा चिन्ह दिसून येत आहेत. यावरून भाजपच्या सभेत काँग्रेसचे प्रचार तर सुरू नाही ना, अस प्रश्न उपस्थित केला जातोय. मात्र या स्टिकर्सबाबत अद्याप कुठलीही माहिती पुढे आली नसली तरी यवतमाळ मध्ये जो प्रकार यापूर्वी घडला होता त्याचीच पुनरावृत्ती वर्ध्याच्या सभेत झाली असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय.
नेमका प्रकार काय?
विदर्भात दुसऱ्या टप्प्यात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्याच्या तळेगाव दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या जाहीर सभेसाठी मोठी तयारी भाजपने केली आहे. सभास्थानी मोठ्या संख्येने खुर्च्या लावण्यात आल्या असून काही खुर्च्या अशाही आहेत ज्यांच्या पाठीमागे राहुल गांधी यांचे स्टिकर लावण्यात आलेले आहे. त्यामुळे मोदींच्या सभेत राहुल गांधीचे स्टिकर लावलेल्या खुर्च्या का?? असा प्रश्न सर्वांना उपस्थित होत आहे. मात्र, मुळात ही चूक खुर्च्या पुरवणाऱ्या कंत्राटदाराची असून याच खुर्च्या काही महिन्यापूर्वी नागपुरात काँग्रेसच्या मेळाव्यात वापरण्यात आल्या होत्या. तेव्हा प्रत्येक खुर्चीच्या मागे काँग्रेसला देणगी देण्यासंदर्भात माहिती देणारे स्टिकर लावण्यात आले होते.
त्यावर राहुल गांधी यांचा फोटो आणि काँग्रेस पक्षाला देणगी देण्यासंदर्भात आवश्यक तपशीलासह क्यूआर कोड छापण्यात आलेला होता. आज मोदीच्या सभेसाठी आणलेल्या खुर्च्यामध्ये काही खुर्च्या काँग्रेसच्या मेळाव्यात वापरण्यात आलेल्या असाव्यात आणि त्यामुळेच त्यांच्यावर हे स्टिकर दिसून येत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण आसच प्रकार यापूर्वी यवतमाळमधील सभेत देखील झाला होता. त्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती वर्ध्याच्या सभेत झाली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येतोय.
इतर महत्वाच्या बातम्या