एक्स्प्लोर

Wardha: वर्ध्याच्या कासरखेड्यात शेतकऱ्याच्या लेकाची कमाल, आराम करायला शेतात बनवली सुखसोयींनी सुसज्ज मचाण

Wadha News: मचाणची उंची 5 ते 6 फूट उंच आणि वजन जवळपास 550 किलो आहे. यावर विद्युतरोधक लावण्यात आले.

Wardha News: वर्धा: शेतात सुरक्षा करण्यासाठी बांधण्यात येणारं मचाण देखील इतकं आलिशान राहू शकतं  याची कल्पना देखील करवत नाही. पण वर्ध्याच्या ग्रामीण भागात कासरखेडा (Wardha Kasarkheda)  या गावात शेतकऱ्याच्या मुलाने भन्नाट डोकं चालवून उंचावर आलिशान मचाण उभं केले आहे. सर्व सुविधांनी युक्त असणाऱ्या या मचाणीमध्ये पंखा, मोबाईल, रेडिओ यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. या मचाणीची (Machan) चर्चा पंचक्रोशीत होत आहे. 

शेतात पिकांच वन्यप्राण्यापासून संरक्षणासाठी शेतकरी लाकडी मचाण तयार करतात. पण ही मचाण पाहिजे तितकी सुरक्षित नसते. शेतकऱ्यांना येणाऱ्या सर्व अडचणी लक्षात घेत  शेतकऱ्यांना शेतात थांबण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मुलाने सुविधायुक्त मचाण तयार केले आहे. त्यात सुरक्षेचा विचार केला आहे. ही मचाण वन्य प्राण्यांना शेतात शिरकाव करण्यापासून रोखते. योगेशने केलेल्या या जुगाडची चर्चा सध्या सगळीकडे आहे. 

वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील कासारखेडा येथील योगेश माणिक लिचडे... घरी शेती असल्यानं त्यातील अडचणी योगेशच्या परिचयाच्या  होत्या.  काही दिवसांपूर्वी रात्री शेतात थांबलेल्या शेतकऱ्याला बिबट्यानं फरफटत नेल्याची बातमी योगेशन ऐकली. बातमीनंतर योगेशची तगमग सुरू झाली. शेतात काम करताना शेतकऱ्यांचा वन्यजीव आणि पाऊस, वीज यापासून बचाव व्हावा, यासाठी योगेशने कल्पकतेने मचाण तयार केले. कदाचित राज्यात हायटेक मचाण तयार करण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. यापूर्वी मचाणीवर कोणी असे प्रयोग केले नव्हते. 

मचाणची उंची 5 ते 6 फूट उंच आणि वजन जवळपास 550 किलो आहे. यावर विद्युतरोधक (Current Proof)  लावण्यात आले. तसेच वरील भागावर सोलर पॅनल लावला आहे. सोलरवर पंखा, लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. मचाणमध्ये रेडिओसारखी मनोरंजनाची तसेच मोबाईल चार्जिंगचीही सुविधा केली आहे. मचाणमध्ये दोन जण आरामात थांबू शकतात. यास झुला देखील लावलाय.  योगेशची मचाण पाहिल्यानंतर मचाणीची मागणी वाढली आहे.  शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, मचाण देणार असल्याचं योगेशन सांगितलं.  मचाणीकरता लोखंडी तसेच आवश्यक साहित्याचा वापर केला. भविष्यात कमी खर्चात जास्तीत जास्त शेतकऱ्याना उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं योगेशन सांगितलं आहे. मचाण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे योगेशकडून सांगण्यात आले. परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने मचाणविषयी माहिती जाणून घेण्यासाठी येत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नारायण राणेंचे निकटवर्तीय कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी; नवव्यांदा वडाळ्याचे किंगमेकर ठरणार?
नारायण राणेंचे निकटवर्तीय कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी; नवव्यांदा वडाळ्याचे किंगमेकर ठरणार?
जयंत पाटील मातोश्रीवर! उद्धव ठाकरेंसोबत तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा, नेमकी काय झाली चर्चा?
जयंत पाटील मातोश्रीवर! उद्धव ठाकरेंसोबत तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा, नेमकी काय झाली चर्चा?
South Africa Women vs New Zealand Women : न्यूझीलंडने प्रथमच महिला टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले; क्रिकेटच्या इतिहासातील न्यूझीलंडचे पहिलं विश्व विजेतेपद
न्यूझीलंडने प्रथमच महिला टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले; क्रिकेटच्या इतिहासातील न्यूझीलंडचे पहिलं विश्व विजेतेपद
लेकासाठी आईचा जीव तळमळला; उमेदवारी घरात मिळून सुद्धा थेट मुंबईकडे धाव!
लेकासाठी आईचा जीव तळमळला; उमेदवारी घरात मिळून सुद्धा थेट मुंबईकडे धाव!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 21 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  21 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 21 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 21 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नारायण राणेंचे निकटवर्तीय कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी; नवव्यांदा वडाळ्याचे किंगमेकर ठरणार?
नारायण राणेंचे निकटवर्तीय कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी; नवव्यांदा वडाळ्याचे किंगमेकर ठरणार?
जयंत पाटील मातोश्रीवर! उद्धव ठाकरेंसोबत तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा, नेमकी काय झाली चर्चा?
जयंत पाटील मातोश्रीवर! उद्धव ठाकरेंसोबत तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा, नेमकी काय झाली चर्चा?
South Africa Women vs New Zealand Women : न्यूझीलंडने प्रथमच महिला टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले; क्रिकेटच्या इतिहासातील न्यूझीलंडचे पहिलं विश्व विजेतेपद
न्यूझीलंडने प्रथमच महिला टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले; क्रिकेटच्या इतिहासातील न्यूझीलंडचे पहिलं विश्व विजेतेपद
लेकासाठी आईचा जीव तळमळला; उमेदवारी घरात मिळून सुद्धा थेट मुंबईकडे धाव!
लेकासाठी आईचा जीव तळमळला; उमेदवारी घरात मिळून सुद्धा थेट मुंबईकडे धाव!
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ठाकरे गट-काँग्रेसच्या जागावाटपाच्या वादात ठाकरेंचा 'बालदोस्त' यशस्वी तोडगा काढणार? आज रात्रीच थेट मातोश्रीवर पोहोचणार!
ठाकरे गट-काँग्रेसच्या जागावाटपाच्या वादात ठाकरेंचा बालमोहनमधील 'बालदोस्त' यशस्वी तोडगा काढणार? आज रात्रीच थेट मातोश्रीवर पोहोचणार!
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीत जागावाटपावरून अजूनही तिढा, रामदास आठवलेंनी किती जागा मागितल्या? देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं?
महायुतीत जागावाटपावरून अजूनही तिढा, रामदास आठवलेंनी किती जागा मागितल्या? देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं?
Baba Siddiqui Murder Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात दहावी अटक; बेड्या ठोकलेला भगवंत सिंग हत्यारे घेऊन उदयपूरहून मुंबईत आला!
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात दहावी अटक; बेड्या ठोकलेला भगवंत सिंग हत्यारे घेऊन उदयपूरहून मुंबईत आला!
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पण तुटेपर्यंत आणू नका! विदर्भात किती जागांवर ठाकरे अन् काँग्रेसमध्ये घमासान सुरु? इशारा देत भास्कर जाधवांनी आकडा सांगितला
पण तुटेपर्यंत आणू नका! विदर्भात किती जागांवर ठाकरे अन् काँग्रेसमध्ये घमासान सुरु? इशारा देत भास्कर जाधवांनी आकडा सांगितला
Embed widget