एक्स्प्लोर

Wadia Hospital | वाडिया हॉस्पिटल व्हेंटिलेटरवर, नवीन रुग्ण भर्ती थांबवली, शेकडो रुग्णांना डिस्चार्ज

बाई जेरबाई वाडिया रुग्णालयाचे 30 कोटी आणि नौरोजी वाडिया रुग्णालयाचे 105 कोटी असे सुमारे 135 कोटी रुपये पालिकेकडे थकित आहेत. वाडिया रुग्णालयाला मागील तीन वर्षांपासूनच्या थकीत रकमेपैकी केवळ 13 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

मुंबई : अख्खं लालबाग परळ जिथं जन्माला आलं ते वाडिया हॉस्पिटल सध्या व्हेंटिलेटरवर आहे. वाडिया हॉस्पिटल प्रशासनानं निधी अभावी नव्या रुग्णांचे अॅडमिशन थांबवली आहेत. तसेच उपचार घेत असलेल्या 300 हून अधिक रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. तर मॅटर्निटी डिपार्टमेंटमधील 100 पेशंट घरी पाठवले आहेत. वाडिया हॉस्पिटलमध्ये सध्या बोनमॅरो ट्रान्सप्लांट, हृदयरोग, मूत्रपिंड इत्यादी सर्व शस्त्रक्रिया बंद केल्या आहेत. शस्त्रक्रियांपासून बाह्यरुग्णापर्यंत सर्व विभाग हळूहळू बंद करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. पालिका, राज्य सरकार आणि रुग्णालय प्रशासनाच्या वादाचा फटका मात्र रुग्णांना बसत आहे. बाई जेरबाई वाडिया रुग्णालयाचे 30 कोटी आणि नौरोजी वाडिया रुग्णालयाचे 105 कोटी असे सुमारे 135 कोटी रुपये पालिकेकडे थकित आहेत. वाडिया रुग्णालयाला मागील तीन वर्षांपासूनच्या थकीत रकमेपैकी केवळ 13 कोटी रुपये देण्यात आले आहेत. नवं सरकार तरी वाडिया रुग्णालयाला निधी देणार आहे की नाही? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारला केला होता. परळ येथील लहान मुलांसाठी प्रसिद्ध असलेलं वाडिया रुग्णालय अनुदानाअभावी चालवणं प्रशासनाला अवघड जात असून हे रुग्णालय आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. मुंबई महानगरपालिकेनं या रुग्णालयासाठी 14 कोटी देऊ केले आहेत. परंतु, अद्याप ती संपूर्ण रक्कम मिळालेली नाही. याचीही दखल मुंबई उच्च न्यायालयानं घेतली होती. मुंबईतील सर्व शासकीय रुग्णालयं सुरळीत चालावण्यासाठी राज्य सरकारतर्फे या रुग्णालयांना निधी देण्यात यावा, अशी मागणी करत दिपेश सिसोदिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. वाडिया रुग्णालय हे खाजगी रुग्णालय असून ते 1932 मध्ये उभारण्यात आले होते. या रूग्णालयाचा संपूर्ण कारभार ट्रस्टमार्फत चालविला जातो. या रुग्णालयावर राज्य सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे सरकारकडून देण्यात येणारा 50 टक्के निधी थांबविण्यात आला होता. आता सरकार बदलले असून निधी द्यावा की नाही याबाबत निर्णय होणं बाकी आहे. त्यासाठी न्यायालयाने वेळ द्यावा, असे राज्य सरकारने म्हटलं होत. दरम्यान, कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि औषधांचा खर्च म्हणून वाडिया रुग्णालयाने राज्य सरकार व मुंबई महापालिकेकडे 40 कोटी रुपयांची मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण करण्यात आली नाही तर वाडिया रुग्णालयाला टाळे लावावे लागले, अशी भीती वाडिया ट्रस्टने व्यक्त करीत राज्य सरकारला व महापालिकेला 2019-20 ची थकबाकी देण्याचा आदेश द्यावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्य सरकार वाडिया रुग्णालयाला पैसे केव्हा देणार आणि पैसे देणार नसल्यास का नाही देणार? याचे स्पष्टीकरण 16 जानेवारीपर्यंत देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत. संबंधित बातम्या : मुंबईत 15 दवाखाने रात्री सुरु ठेवण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मुंबईत नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक मुंबईत एका झाड लावण्यासाठी किमान 59 हजार रुपयांचा खर्च, 33 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प महापालिकेला डोईजड

महत्त्वाच्या बातम्या

इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Maharashtra Live blog updates: अभिजीत दिपकेंनी वाहिली आजीला श्रद्धांजली, दोन दिवस हिंगोलीतच थांबणार
Maharashtra Live blog updates: अभिजीत दिपकेंनी वाहिली आजीला श्रद्धांजली, दोन दिवस हिंगोलीतच थांबणार
Drishyam 3 OTT Release: अजय देवगणच्या 'दृश्यम 3'ची OTT रिलीज डेट काय? कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार? विजय साळगावकरची थरारक कहाणी
अजय देवगणच्या 'दृश्यम 3'ची OTT रिलीज डेट काय? कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार? विजय साळगावकरची थरारक कहाणी
MPSC Protest Pune: सॅल्यूट, टाळ्या आणि घोषणा...; MPSC आंदोलन स्थगित होताच विद्यार्थ्यांनी पोलिसांसाठी काय केलं?; VIDEO तुफान व्हायरल
MPSC आंदोलन स्थगित होताच विद्यार्थ्यांनी पोलिसांसाठी काय केलं?; VIDEO तुफान व्हायरल

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Abhijeet Dipke: आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
Abhishek Sharma World Record : अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
Chanakya Niti: कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
Nagpur Election 2026: अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
Embed widget