Narendra Modi On Gold Rate: सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Narendra Modi On Gold Rate: वर्षभरापूर्वी देशवासियांना सोन्याची अनावश्यक खरेदी टाळण्याचं आवाहन केल्यानं जनतेच्या पैशांची बचत झाल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

Narendra Modi On Gold Rate: वर्षभरापूर्वी देशवासियांना सोन्याची अनावश्यक खरेदी टाळण्याचं आवाहन केल्यानं जनतेच्या पैशांची बचत झाल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi On Gold Rate) यांनी केलं आहे. लखनौतील पाचव्या कौशल्यविकास दीक्षांत समारंभामध्ये ते बोलत होते. तसेच लोकांनी खरेदी करणं टाळल्यानं सोन्याचे भावही पडले आणि जनता आपले आभार मानत असल्याचंही यावेळी पंतप्रधानांनी नमूद केलं.
कौशल्याला सन्मान दिल्याशिवाय विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होणार नाही असं म्हणत पंतप्रधान मोदींनी देशातील कौशल्य विकासाचं महत्त्व अधोरेखित केलं. IIT असो की ITI दोन्ही देशाची अमूल्य संपत्ती आहेत. त्यामुळे ITI च्या विद्यार्थ्यांनाही IIT इतकाच सन्मान मिळायला हवा अशी इच्छाही यावेळी मोदींनी व्यक्त केली. (Gold Rate Marathi News)
मोदींच्या आवाहनानंतर सोन्याच्या दरात किती घट? (Narendra Modi On Gold Rate)
- 11 मे रोजी पंतप्रधान मोदींचं सोनं न खरेदी करण्याचं आवाहन
- 11 मे रोजी सोन्याचा दर 1.52 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम
- 20 नोव्हेंबरला सोन्याचा दर 1.22 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम
- मेपासून सोन्याच्या दरात 30 हजार रुपयांची घट
- सोन्याच्या दरात जवळपास 20 टक्क्यांची घसरण
सोन्यात भेसळ, 22 कॅरेटच्या नावाखाली 20 कॅरेटचे सोने- (Gold Rate Marathi News)
तुळशी विवाहानंतर आजपासून दिल्लीसह देशभरात लग्नसराईच्या हंगामाला सुरुवात होत आहे. देशभरात तब्बल 52 लाख विवाह सोहळे पार पडणार असून, त्यातून सुमारे 6 लाख कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. तर दिल्ली-एनसीआरमध्ये 5 लाख विवाह सोहळ्यांतून 1 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याचा अंदाज आहे. मात्र, लग्नसराई सुरू होत असतानाच सोन्याच्या बाजारात भेसळ करण्याचा हायटेक प्रकार समोर आल्याने व्यापारी आणि ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. दिल्ली आणि देशभरातील व्यापारी व उद्योजकांची प्रमुख संघटना असलेल्या चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री (CTI) चे अध्यक्ष बृजेश गोयल यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तांमुळे दागिन्यांच्या उद्योगात खळबळ उडाली आहे. लग्नसराईच्या ऐन हंगामात सोन्याच्या आणि दागिन्यांच्या विक्रीत घट होण्याची भीती व्यापाऱ्यांना सतावत आहे. CTI कडे शेकडो व्यापाऱ्यांनी या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. सोन्याचे वजन वाढवण्यासाठी चीनमधून येणाऱ्या 'रेनियम पावडर'सह रूथेनियम, इरिडियम आणि ऑस्मियम यांसारख्या जड धातूंची सोन्यात भेसळ केली जात आहे. या धातूंची घनता सोन्याइतकी किंवा त्याहून अधिक असल्याने जुन्या तपासणी यंत्रांद्वारे ही भेसळ ओळखणे कठीण होत असल्याचे सांगितले जात आहे. एका प्रयोगातून समोर आले की, 22 कॅरेट असल्याचे सांगून विकल्या जाणाऱ्या दागिन्यांमध्ये प्रत्यक्ष सोन्याचे प्रमाण केवळ 81.73 टक्के होते. म्हणजेच हे सोने जवळपास 20 कॅरेटच्या दर्जाचे होते. प्रत्यक्षात 22 कॅरेट सोन्यामध्ये किमान 91.6 टक्के शुद्ध सोने असणे आवश्यक आहे. तरीही संबंधित दागिना हॉलमार्किंग तपासणीत उत्तीर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे CTI ने म्हटले आहे (Adulteration In Gold Marathi News)
वर्षभरापूर्वी अनावश्यक सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन केल्यानं देशवासियांचे पैसे वाचले, VIDEO:
संबंधित बातमी:
Before You Go
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO





















